अल्पावधीतच आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्रात आपले ठसे उमटवणाऱ्या Kya News (Know Your Area) या ऍपचा अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील शिर्डीत पार पडला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी १०० हुन अधिक पत्रकारांची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी Kya News च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या चारोळ्या. दरम्यान Kya News चे देवेश गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधत ऍप विषयी अधिक माहिती दिली.
दिवसरात्र एक करून पत्रकार हा बातमी गोळा करण्याचे काम करत असतो. दरम्यान अपुरे मानधन आणि त्यात जाहिरात मिळविण्यात पत्रकारांची होणारी दगदग यामुळे पत्रकारांना कधीकधी नैराश्याला सामोरे जावे लागत असते. या संपूर्ण समस्यांचा गांभीर्याने विचार करून Kya News ऍप चे संस्थापक देवेश गुप्ता यांनी संपूर्ण भारतातील पत्रकारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या ऍप ची निर्मिती केली. त्यामुळे आता Kya News ऍप मध्ये बातम्या टाकल्यावर पत्रकारांना दर महा आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे देवेश गुप्ता यांनी सांगितले आहे. बातम्यांना जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे मानधन असे या ऍप चे मुख्य वैशिट्य आहे. त्यामुळे आता पत्रकारांची आर्थिक बाजू विकसित करण्यामध्ये आमचा खारीचा वाटा असेल असे गुप्ता यांनी या वेळी सांगितले आहे.
या प्रसंगी वेधशाळा संस्कृत वाहिनी देखील Kya News वर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे आता Kya News वर या पुढे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेसोबत संस्कृतमध्ये देखील बातम्यांचे अपडेट्स मिळणार असल्याचे वेधशाळा संस्कृतचे अध्यक्ष डॉ. अर्जुन व्यास यांनी सांगितले.
दरम्यान उत्कृष्ट पत्रकार, प्रसिद्ध वृत्तनिवेदक व भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी उपस्थित समस्त पत्रकारांचे मार्गदर्शन केले आणि Kya News च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा