डोंबिवली : दिनांक २१/०१/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पो.हवा. दत्ताराम भोसले यांना डोंबिवलीत पट्टेरी वाघाचे कातडे, देशी पिस्टल व २ जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी दोन तस्कर येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कल्याण-शिळफाटा रोडवरील 'क्लासिक हॉटेल'च्या पार्किंगमध्ये गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलीस पथकाने सापळा रचुन सिताराम रावण नेरपगार (वय: ५१ वर्षे) राहणार- रिष्दी सिष्टी कॉलनी, २३/ जीएन, तुळजाभवानी नगर, चोपडा, जिल्हा- जळगाव, व ब्रिजलाल साईसिंग पावरा (वय:२२ वर्षे) राहणार- मु.पो. कोडीत ता. शिरपुर जि. धुळे हे पट्टेरी वाघाचे सोलुन काढलेले, कडक झालेले व सुकवलेले कातडे आणि विनापरवाना १ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व २ जिवंत काडतुसे (राऊंड) असे विक्री करण्याकरिता 'स्विफ्ट डिझायर' कार क्र. एमएच २७ /एसी ४०७५ या कारमधुन आले असता त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन पट्टेरीव वाघ सोललेले कडक झालेले व सुकवलेले कातडे, विनापरवान्याचे एक देशी बनावटीचे पिस्टल(अग्निशस्त्र), २ जिवंत काडतुसं (राऊंड), 'स्विफ्ट डिझायर' कार क्र. एमएच २७ / एसी ४०७५, दोन मोबाईल फोन व आधारकार्ड असा एकुन ४५,५२,०००/- (पंचेचाळीस लाख बावन्न हजार) रूपये किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत केला आहे.
त्यांनी पट्टेरी वाघाचे कातडे, १ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व २ जिवंत काडतुसं (राऊंड) हे कोणत्या उद्देशाने व कोणास विक्री करण्याकरीता आले होते याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. सदर २ आरोपींविरुद्ध मानापाडा पोलीस ठाणे गु.र.नं. १५७/२०२४ वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९ (अ), ५०(१), (अ) (ब) (क), ५१ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ (१) (अ) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे सहा.पो.निरी. संदिप चव्हाण हे करीत आहेत.प्रस्तुत यशस्वी कामगिरी ठाणे जिल्ह्याचे मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहा. पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पो.हवा. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडु, विनोद चन्ने, तसेच वनपाल वन विभाग, कल्याण येथील वनपाल राजु शिंदे, वनरक्षक महादेव सांवत यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा