BREAKING NEWS
latest

'नवभारत साक्षरता अभियान' अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१७ : महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना) विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी दि.१७.०३.२०२४ रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलेले होते. या चाचणीचे पुर्व नियोजन क.डों.मनपा शिक्षण नियोजनबद्ध प्रकारे केलेले होते, त्यासाठी सिआरसी प्रमुख आणि परिक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सिआरसी प्रमुखांचे परिक्षा केंद्रावर नियंत्रण होते.
क.डो.मनपा शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण ६२७ असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आली असुन एकूण '८२ परिक्षा केंद्रावर' असाक्षरांची परिक्षा सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत घेण्यात आली. सदर परिक्षा केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, एसएसए कर्मचारी यांच्या भेटी, परिक्षेच्या वेळी झाल्या. वरिष्ठ नागरिक यांनी देखील काही ठिकाणी असाक्षरांची चाचणी दिली. सदर परिक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी रंजना राव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, यांच्या आदेशानुसार आणि सुचनेनुसार सदर परिक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकाऱी, कर्मचारी (एसएसए) सर्व सिआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. शिक्षण विभागाचे सदर परिक्षेचे कामकाज  शि.वि.अधिकारी लक्ष्मण जाधव नोडल अधिकारी आणि चंद्रमणी सरदार (विषय तज्ञ) तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास विखार सर यांनी पाहिले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत