BREAKING NEWS
latest

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाशेजारी स्वच्छतागृह आणि निवारा केंद्र उभारले जाणार

खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांना यश; लोकसेवा वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून बीएमसीच्या सहकार्याने प्रकल्प उभारला

मुंबई: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर मनपा रुग्णालयाशेजारी ट्रॉमा रुग्ण, त्यांचे नातेवाईक, पादचारी, ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी आणि परिसरातील नागरिकांसाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज स्वच्छतागृह आणि निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.

या केंद्राचे भूमिपूजन नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि लोकसेवा वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले. या स्वच्छतागृहात २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे, तर निवारा केंद्रात ३८ बेडची सोय केली जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींनाही विशेष सोयी उपलब्ध असतील.

याशिवाय, बाळासाहेब ठाकरे मनपा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांसाठी आमदार निधीतून वाचनालय देखील उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता मा. श्री. सुधीर मेढेकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुखदेव, डॉ. पटवारी, डॉ. गांगण मॅडम, डॉ. मनिष यांच्यासह इतर कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार रवींद्र वायकर यांनी हा प्रकल्प जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत