BREAKING NEWS
latest

ठाण्यातील 'एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर' च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाण्यातील कापुरबावडी जंक्शन येथील हाय स्ट्रिट मॉल, येथे 'एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर' च्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर कारवाई करून ७ बळीत महिलांची खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्याकडून सुटका करण्यात आली आहे.
ठाणे शहर परिसरातील कापुरबावडी जंक्शन, येथील असलेल्या 'हाय स्ट्रिट मॉल, येथे 'एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर' येथे स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोआ. शेखर बागडे, शोध-१. गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना मिळालेल्या बातमीवरून त्यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, पोउपनिरी. तावडे व पोलीस पथकातील अंमलदार यांनी दिनांक ०८/१०/२०२४ रोजी १६:०० वा 'एवलोन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर', हाय स्ट्रिट मॉल, कापुरबावडी जंक्शन, ठाणे येथे बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी पंच व पोलीस पथकाने छापा कारवाई करून सदर छाप्यात मॅनेजर नामे १) राहुल किसन गायकवाड (वय: १९ वर्षे) राहणार. बरूवा हाऊस समोर, पातलीपाडा, ठाणे पश्चिम मुळ राहणार मु.पो. पारडी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ २) प्रिया उर्फ रूप भगवानदास दुडेजा (वय: २६ वर्षे) राहणार. रूम नंबर ७/७०२, ग्रिन गॅलेक्सी अपार्टमेंट, कल्याण रेल्वे स्टेशन समोर, कल्याण पश्चिम यांना ताब्यात घेवुन ७ पीडीत महिलांची सुटका केली. सदर मसाज पार्लरच्या मधुन वेश्याव्यवसायातून मिळविलेली एकूण ७,८५०/- रूपये रोख रक्कम, २ मोबाईल, एटीएम/क्रेडीट कार्ड स्वाईप मशिन, व इतर साहीत्य कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वरील दोन मॅनेजर, चालक व पाहीजे आरोपी मालक १) सुंधाशु कुमार सिंग २) कविता पवार यांच्या  विरोधात कापुरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क्र. ८२७/२०२४ भारतीय न्याय संहिता दंड कलम १४३(१), १४३(२), १४३(३) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे दिनांक ०९/१०/२०२४ रोजी दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह-आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, कापडणिस, पोउनि. विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सपोउनि. बाबर, ढोकणे, भोसले, मपोहवा. पावसकर, परांजपे, पोहवा. कानडे, शिंपी, गुरसाळी, मपोहवा, पोशि. शेजवळ, मपोशि. भोसले, करे, चापोना. हिवरे यांनी यशस्वीपणे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत