डोंबिवली : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आज कल्याण-डोंबिवली माजी स्थायी समिती सभापती तसेच शिवसेना शिंदे गटातील महाराष्ट्र राज्याचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उबाठा शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
मातोश्री वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केल्यानंतर ते डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून ते बाजीप्रभू चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते उबाठा गटाचा कार्यालयात गेले व तेथे फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात डोंबिवलीतील शिंदे सेनेचे आणखी काही पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेणार असल्याची कुजबुज सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा