डोंबिवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त 'भगवा पंधरवडा' या उपक्रमात डोंबिवलीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान शिवसेना शाखा क्र.६५ चे कल्याण-डोंबिवली महापालिका माजी नगरसेवक तथा परिवहन समिती माजी सभापती संजय लक्ष्मण पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील रुग्णांना मोफत फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पार पडला. हॉस्पिलमधील रुग्णांना फळे आणि उबदार ब्लँकेट चे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील अनेक त्रुटी यावेळी आमदार राजेश मोरे यांना पहावयास मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे, अपर्णा पावशे, वृषाली रणजित जोशी, केतकी पवार, सुभाष गायकवाड, धनाजी चौधरी, कल्पना कांबळे, सुदाम जाधव, यांच्यासह शिवसैनिक तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आमदार राजेश मोरे यांनी शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी यांची भेट घेतली तेव्हा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुखसुविधा मिळत नसल्याच्या अनेक त्रुटी यावेळी पहावयास मिळाल्या.
आमदार राजेश मोरे यांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन..
शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे व ब्लँकेट चे वाटप करत प्रसूती कक्षात गेला असता पासूतिकक्षात बेडची कमतरता असल्याने एका महिला रुग्णाला चक्क जमिनीवर औषधोपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. याबाबत हॉस्पिटलचे प्रभारी वैद्यकीय प्रमुख डॉ. योगेश चौधरी यांनी त्यांच्या अनेक समस्या आमदार मोरे यांच्यासमोर मांडल्या. सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ, भुलतज्ञ डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आणि जागेचा अभाव असल्याच्या समस्या इस्पितळातील नर्स व कर्मचाऱ्यांनी मांडल्या. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये पोलिस चौकीची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी अनेक वेळा काही लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमदार मोरे यांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना तुमच्या समस्या सोडविण्यासाठी हा विषय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून समस्या कशा जलदगतीने सोडविल्या जातील, याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन प्रसिद्धी माध्यमांसमोर देत सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा