कल्याण : आरोग्य व शिक्षण, विभागाची माला आवड असल्याने या विभागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मत नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हिंगोली जिल्हा अधिकारी पदी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदी केल्याचे समाधान नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, त्या धरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे मत महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडले.
कल्याण डोंबिवली या शहरी भागात आपल्या क्षेत्राचे आव्हाने, त्याचे भविष्यातील नियोजन , आणि आपल्याकडे काय काय समस्या आहे, काय काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या विकास कामांचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना गती देण्याची आपल्याला गरज आहे, त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून आपल्याला त्या कामावर भर देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिके च्या अनधिकृत ६४ बिल्डिंगचा प्रश्न न्याय प्रविष्ट असल्याने आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले, फूट पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा