जोगेश्वरीत संतापाचा उद्रेक! पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध — देशद्रोहींचा कायमचा नायनाट करा!
आंदोलन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग क्रमांक ४ तर्फे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली आणि निषेध आंदोलन
मुंबई | २३ एप्रिल २०२५ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्वेत आज सायंकाळी ५.३० वाजता एकजुटीने निषेध नोंदवण्यात आला. हा कार्यक्रम १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग क्रमांक ४ तर्फे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्टेशनजवळ आयोजित करण्यात आला होता.
विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत व महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. या वेळी शाखाप्रमुख, शाखा संघटिका, शिवसैनिक, युवा सेना, अल्पसंख्यांक व्यापारी विभाग, उत्तर भारतीय मंच, अनुसूचित जाती अंगीकृत संघटना यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मेणबत्त्या पेटवून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. नंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्याचा निषेध केला.
"दहशतवादी आणि त्यांच्या मदतीला धावणाऱ्या देशद्रोहींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही केवळ श्रद्धांजली नव्हे, तर संपूर्ण देशातील जनतेचा संताप आहे!"
अशा जोरदार भावना ज्ञानेश्वर सावंत यांनी व्यक्त केल्या.
प्रियांका आंबोळकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं,
"आज देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना उत्तर देण्यासाठी आपण एकवटले पाहिजे. महिलांसाठी सुरक्षित भारत ही आपली जबाबदारी आहे."
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली –
"दहशतवाद्यांना फाशी द्या!"
"देशद्रोहींचा कायमचा नायनाट करा!"
"भारत माता की जय!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा