कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १८ रोजी रात्रीच्या वेळी, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण (पुर्व) येथे फिर्यादी राजेश देवीदयाल मेहुलीया (वय: ४६ वर्षे), काम रिक्षा चालक, राहणार: जय श्रीहरी सोसायटी चाळ न. १, रूम नं ८, जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण पुर्व यांची रहात्या घरासमोर पार्क केलेली रिक्षा ही अज्ञात इसमाने चोरी करून नेली म्हणुन कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३१४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २०/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर दाखल गुन्ह्याच्या तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत माहीती काढून कौशल्यपुर्ण तपास करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून रेकॉर्डवरील आरोपी प्रांजल मनोज बर्वे, (वय: २६ वर्षे), राहणार: रूम नं. १५, योगेश अपार्टमेंट, करपे वाडी, न्यु जिम्मी बाग, कल्याण (पुर्व) यास चोरी केलेल्या रिक्षा सह शिताफीने पकडून दि. २१ रोजी अटक केली व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले ६५,०००/- रू. किंमतीची MH-05-CG-8672 रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-३, कल्याण श्री. अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरी.गणेश न्हायदे,सहा.पो.निरी. दर्शन पाटील, संदीप भालेराव, पोहवा. बुधवंत, जाधव, भामरे, वाघ, सौंदाणे, जरग, कापडी, पोशि. सोनवळे, सोनवणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा