BREAKING NEWS
latest

पालपेणे गावात आरोग्य महोत्सव! संतोष जैतापकर यांच्या पुढाकाराने गावात आनंदाची लाट!

"गुहागरमध्ये आरोग्याची पर्वणी! संतोष जैतापकर यांच्या पुढाकाराने मोफत तपासणी आणि रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद"

गुहागर, दि. १० एप्रिल –पालपेणे गावात नुकताच एक जनहितकारी आणि आरोग्यवर्धक उपक्रम पार पडला, जिथे ‘आरोग्य हेच खरे धन’ हे साकारणारे संतोष जैतापकर वैद्यकीय टीम आणि वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हेमोग्लोबिन व इतर तपासण्या करण्यात आल्या. तरुणांनी रक्तदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे मार्गदर्शक म्हणून समाजसेवक आणि भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत, “कोणतीही वैद्यकीय अडचण असल्यास आमच्या वैद्यकीय टीमशी थेट संपर्क साधा, आम्ही नक्कीच मदत करू,” अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ, मुंबई आणि संतोष जैतापकर वैद्यकीय टीम यांच्या सहकार्याने पार पाडले गेले. संदीप खैर यांच्या नेतृत्वाखाली टीम खास मुंबईहून शिबिरासाठी हजर होती.

ग्रामस्थ, स्वयंसेवक व तरुण मंडळी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आरोग्य महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला.

"हे केवळ शिबिर नव्हे, तर आरोग्य जनजागृतीचा सुरुवातीचा टप्पा होता – असे उपक्रम पुढेही राबवणार आहोत," असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत