दिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जी. एम बिल्डिंग, चर्चगेट येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य मुद्दे:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पुतळा बसविणे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी केली गेली. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे स्मारक: मुंबई सेंट्रल टर्मिनसला मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.
खेळाडूंना रेल्वेमध्ये नोकरीची संधी: मुंबई व महाराष्ट्रातील खेळाडूंना भारतीय रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळावी, अशी मागणी केली.
मराठी भाषेचा वापर: पश्चिम उपनगरातील सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर मराठीतून उद्घोषणा करण्यात यावी, तसेच रेल्वे व्यवहारांमध्ये मराठी भाषेला अनिवार्य करण्यात यावी.
एस्केलेटरची दुरुस्ती: पश्चिम उपनगरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या एस्केलेटरची तातडीने दुरुस्ती केली जावी, कारण अनेक एस्केलेटर कायम बंद असतात.
रुग्णवाहिका सेवा: रेल्वे स्टेशनजवळील रुग्णालयांसोबत संपर्क करून रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करावी.
गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना: मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात.
प्लॅटफॉर्म लांबी वाढविणे: १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, विशेषतः अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथे.
जोगेश्वरी जंक्शनला मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी: जोगेश्वरी स्टेशन जंक्शन घोषित झाल्यामुळे, त्याला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीने जोडावे. येथे पार्किंग, हॉटेल, मॉल यांसारख्या सुविधांचा समावेश करावा.
जोगेश्वरी जंक्शनला मेट्रो आणि विमानतळाशी जोडणे: जोगेश्वरी जंक्शनला मेट्रो आणि मुंबई विमानतळाशी थेट जोडले जावे.
स्वयंचलित शिड्यांची आवश्यकता: सर्व उपनगरी रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित शिड्यांची आवश्यकता असताना अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथे १००% शिड्यांची मागणी केली.
सुरक्षितता आणि हेल्पलाईन: मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. सध्या १३९ हा देशव्यापी क्रमांक आहे, पण वेळेवर मदत मिळत नाही.
रेल्वे लोकलसाठी स्वतंत्र विभाग: मुंबई लोकलसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा आणि त्यासाठी विशेष विभागीय व्यवस्थापकाची नियुक्ती करावी.
शौचालयांची नियमित साफसफाई: रेल्वे स्थानकांवरील शौचालयांची साफसफाई विमानतळाप्रमाणे नियमित केली जावी.
स्तनपान कक्षांची उपलब्धता: स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र स्तनपान कक्ष उपलब्ध करावेत.
एसी लोकल फेऱ्या वाढविणे: एसी लोकलची मागणी लक्षात घेता त्यांची फेरे वाढवावी.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपाययोजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डब्यांमध्ये होणाऱ्या गैरसोयींसाठी स्वतंत्र उपाययोजना कराव्यात.
पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्यांची सुविधा: जोगेश्वरी पूर्व येथील अंबोली फाटकाजवळ पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्यांची सुविधा असावी, तसेच गोरेगाव पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या जवाहर नगर रेल्वे पादचारी पुलावर स्वयंचलित शिड्या बसवाव्यात.
अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण: रेल्वे स्थानकांवर आणि आजुबाजूला वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रेल्वे गस्त पथक तयार करावे.
प्राथमिक उपचार केंद्रांची स्थापना: प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज प्राथमिक उपचार केंद्राची स्थापना करावी.
सातत्याने पाठपुरावा: या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत खासदार रवींद्र वायकर, कमिटी अध्यक्ष आमदार चित्रा वाघ, खासदार शोभा बच्छाव, खासदार नरेश म्हस्के, विक्रम सिंह, खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईकरांच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा