BREAKING NEWS
latest
news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
news लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आज आणि उद्या मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक.. नागरिकांची होणार गैरसोय

आज आणि उद्या मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक.. नागरिकांची होणार गैरसोय...

रोहन दसवडकर 

उपनगरी रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावर शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेणार आहे . तर रविवारी ५ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुर्ला ते वाशी अप - डाउन हार्बर मार्गावर , रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत. परिणामी सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत . ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील . तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सुरू राहणार आहे .

मध्य रेल्वे भायखळा ते माटुंगा अप - डाउन जलद मार्गावर, शनिवारी मध्य रात्री १२.३५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत. परिणामी या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणाऱ्या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील . तसेच दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल . डाउन मेल / एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येणार आहे . 
.
.
.
.
#मुंबई #localtrain #मेगाब्लॉक #latestnews  

मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक... फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मध्ये घडली पेपर लीकची घटना

मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक... फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज मध्ये घडली पेपर लीकची घटना

रोहन दसवडकर

फोर्ट मधील सिद्धार्थ कॉलेज मध्ये तृतीय वर्षाचा मुंबई विद्यापिठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉम याचा कॉमर्स -५ या विषयाचा पेपर एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सॲप वर लीक झाला आहे. परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार सिद्धार्थ कॉलेजमध्ये समोर आला आहे . याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे . विद्यापीठाची हिवाळी सत्राची परीक्षा सुरू आहे . 
फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे . कॉलेज प्रशासनातर्फे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , सिद्धार्थ विद्यापीठाकडे तक्रार कॉलेजमध्ये टी.वाय.बी.कॉम.ची ( सत्र ५ ) परीक्षा सुरू आहे . ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास कॉमर्स -५ या विषयाचा पेपर होता . त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता . परीक्षा हॉलमध्ये माने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जबाबादारी पार पाडत असताना एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपमध्ये कॉमर्स -५ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसून आले. माने यांनी मोबाइल ताब्यात घेतला . 
प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक त्यांच्या परीक्षा आरोपी गिरगाव येथील भवन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे . त्याला त्याचा मित्र व गुन्ह्यातील सहआरोपी सूरज याने सकाळी ९ .३७ वाजता व्हॉट्सॲपद्वारे ही प्रश्नपत्रिका पाठविली होती . याबाबत तत्काळ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली .या केंद्राचा नसून अन्य परीक्षा केंद्राचा Q असल्याचे स्पष्ट झाले .
विद्यपीठाकडे तक्रार आली आहे . पण पेपर फुटलेला नाही . एकाच मुलाच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले आहे. असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले .

मुंबईतील दुकानातून 5 कोटींहून अधिक किमतीचे हिरे चोरीला गेले, 2 कामगारांना अटक

मुंबईतील दुकानातून 5 कोटींहून अधिक किमतीचे हिरे चोरीला गेले, 2 कामगारांना अटक...

रोहन दसवडकर

  मुंबईतील रत्न कंपनीच्या दुकानातून सहा महिन्यांत 5.62 कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेल्याचा आरोप असून त्यानंतर पोलिसांनी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बोर्समध्ये स्टोअर असलेल्या जेबी अँड ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक संजय शाह यांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या स्टॉकमधून ५.६२ कोटी रुपयांचे हिरे गहाळ झाल्याचा दावा केला, असे बीकेसी पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

कांदिवली येथील कंपनीचे कर्मचारी प्रशांत शहा आणि विशाल शहा हे दोघे एप्रिल महिन्यापासून त्यांच्या दुकानातून हिरे चोरत असल्याचा तक्रारदाराला संशय होता. कंपनीचा माजी कर्मचारी नीलेश शहा याने चोरीचे हिरे विकण्यात या दोघांना मदत केल्याचा आरोप पोलिसांनी एफआयआरचा हवाला देऊन केला आहे.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्यावर संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली 420 (फसवणूक) सह गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'नाळ भाग - 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.....

नाळ भाग २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...

रोहन दसवडकर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, नागराज मंजुळे
ज्यांनी 'नाळ'च्या पहिल्या भागाला पाठिंबा दिला होता, त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर नाळ - 2 चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 'नाळ पार्ट 2' चा टीझर सोशल मीडियावर आला आहे. आता 'नाळ पार्ट 2' मध्ये कोण कलाकार असणार आणि त्यातील गाणी याबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागली आहे. 
  चित्रपट निर्माते सुधाकररेड्डी म्हणाले, "माझा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आई-मुलाच्या नात्याची ही अतिशय साधी कथा होती. आता तेच घडणार आहे. 'नाळभाग 2' प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ ह्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप अद्वितीय होता आणि अजूनही आहे. नागराज मंजुळे हे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सर्वच भूमिकांमध्ये अव्वल आहेत आणि झी स्टुडिओचा विचार केला तर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला आजवर अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
   आता या दोघांशी माझी 'नाळ'ही जोडली गेली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे आणि चैत्या त्याच्या खऱ्या आईच्या वाटेवर आहे, आता त्याचा प्रवास त्याला कुठे घेऊन जाईल याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहांतून कळेल.'' सुधाकर रेड्डी यक्कांती पुढे म्हणाले. हा चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुकेश अंबानींना चार दिवसांत तिसरी धमकी : मागणीची रक्कम वाढली 400 कोटी रुपये, ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले- देशाच्या सर्वोत्तम शूटर कडून मारण्याची धमकी...

मुकेश अंबानींना चार दिवसांत तिसरी धमकी : मागणीची रक्कम वाढली 400 कोटी रुपये, ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले- देशाच्या सर्वोत्तम शूटर कडून मारण्याची धमकी...

रोहन दसवडकर
 
 देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांना चार दिवसांत तिसरी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 27 आणि 28 ऑक्टोबरला धमक्या मिळाल्यानंतर मुकेश अंबानींना सोमवार 30 ऑक्टोबरला पुन्हा धमकी मिळाली आहे. 
    गमदेवी पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी मुकेश अंबानी यांना त्यांच्या कंपनीच्या मेल आयडीवर एक ई-मेल आला. यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तत्पूर्वी, शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी याच मेलवर 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. देशाच्या सर्वोत्तम नेमबाजांकडून त्यांंना मारले जाईल, असे मेलमध्ये म्हटले होते. 
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच अकाउंटवरून आलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता ही रक्कम 200 कोटी रुपये आहे, जर ती मिळाली नाही तर डेथ वॉरंटवर स्वाक्षरी करा.' यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पहिल्या धमकीच्या ईमेलमध्ये 'तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत', असे लिहिले होते.
  27 ऑक्टोबर रोजी पहिला ईमेल प्राप्त झाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. याआधीही अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची सुरक्षा झेड श्रेणीवरून झेड+ केली होती. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये आहे.
  


फक्त चंद्राची वाट...करवा चौथवर 15000 कोटी रुपये खर्च, दिल्लीत मोडणार सर्व विक्रम!

फक्त चंद्राची वाट...करवा चौथवर 15000 कोटी रुपये खर्च, दिल्लीत मोडणार सर्व विक्रम!  

 रोहन दसवडकर

देशात सणांचा हंगाम जोरात सुरू आहे आणि नोव्हेंबर महिना करवा चौथ ते दिवाळीपर्यंत सणांनी भरलेला असतो. यावेळी सणांमध्ये गेल्या काही सणांवर नजर टाकली तर विक्रीचे नवे रेकॉर्ड बनवले जात आहेत आणि करवा चौथसाठीही असेच अंदाज बांधले जात आहेत.  या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीचा जो उत्साह दिसतो, तो पाहता देशभरात 15 हजार कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो, असा अंदाज आहे. 
    जर आपण मागील वर्ष 2022 बद्दल बोललो तर करवा चौथच्या दिवशी सुमारे 11,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यावेळी या आकड्यात मोठी झेप घेतली जाऊ शकते आणि एकट्या राजधानी दिल्लीत जवळपास 1500 कोटी रुपयांची खरेदी होऊन मागील सर्व विक्रम मोडीत निघतील असाही अंदाज आहे.गेल्या वर्षी करवा चौथच्या दिवशी दिल्लीत सुमारे 1100 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. 
     चाळणी, दिवा आणि पूजेशी संबंधित साहित्याशिवाय यावेळी चांदीपासून बनवलेल्या कारव्यालाही बाजारात मोठी मागणी आहे. व्यापारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिवाळीच्या दिवशी देशभरात 3.5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. सुमारे 65 कोटी लोक दिवाळीला खरेदी करतील आणि प्रति व्यक्ती सरासरी खरेदी 5,500 रुपये असेल असा अंदाज आहे. त्याचवेळी, यंदाच्या उत्सवांमध्ये व्होकल फॉर लोकल आणि सेल्फ-रिलेंट इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी, चिनी उत्पादनांची आयात केली जात नाही. ग्राहकांनाही चीनमध्ये बनवलेल्या वस्तू घ्यायच्या नाहीत. सीमेवरील तणावानंतर चिनी उत्पादनांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. अशा स्थितीत यंदाही सणासुदीच्या काळात बाजारपेठेत चिनी वस्तूंची विक्री होणार नाही. आणि एकूणच करवा चौथ उत्साहात साजरी केली जाणार असे चित्र दिसून येत आहे.

कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता


      कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता

न्याय रणभूमी प्रतिनिधी - रोहन दसवडकर

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. कोकण कला व शिक्षण विकास ही एक संस्था आहे जी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे समाजाला चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करते.  ही संस्था वंचित मुलांना मदत करते आणि शिक्षण, गावाचा विकास, अनाथाश्रमांना मदत, आपत्ती निवारण मदत आणि गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी वैद्यकीय मदत यांना प्रोत्साहन देते.  
    २९ ऑक्टोबर २०२३ रोजी या संस्थेची यशाची आणि इतरांच्या मदतीची यशस्वी १२ वर्षे पुर्ण झाली. भव्य दिव्य अशी सजावट या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व  'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री  सौ. दीपा परब - चौधरी यांनी देखील स्वतःची उपस्थिती दर्शवली. त्यांना कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर माल्वणींतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.
   याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.