BREAKING NEWS
latest

मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पालघर ते सिंधुदुर्ग व्हाया डोंबिवली झंझावाती दौऱ्याला आबालवृद्ध नागरिकांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा सोमवारपासून पालघर ते सिंधुदुर्ग असा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून त्यांच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध नागरिक त्यांचे मनोमन स्वागत करत असून 'अभी नही तो कभी नही' म्हणत कमळ फुलणार असे आशीर्वाद देत आहेत.
पालघर, वसई, वाडा, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पाली, महड, रायगड, कर्जत, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, कुडाळ, सिंधुदुर्ग या सर्व ठिकाणी त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असून मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे जाणवत आहे असे ठिकठिकाणी दिसून आल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, अदिती तटकरे यांसह प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आदी सर्व नेतेमंडळी भरपूर कार्यरत असून कोकणात बहुतांशी ठिकाणी महायुतीला यश मिळणार असल्याचे आशीर्वाद नागरिकांनी दिले. नव मतदारांना पहिल्यांदाच संधी असल्याने त्यांना भरपुर उत्साह आहे. मंत्री चव्हाण यांच्या साध्या राहणीमान आणि जीन्स पॅन्ट, चेक्स शर्टने युवकांना भुरळ घातली असून आपल्यातले मंत्री अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्याचे सर्वत्र ऐकिवात आले.

विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर.बालकृष्णन यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष ‍निवडणूक निरीक्षक (निवडणूक खर्च) बी.आर.बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे हा राज्यातील महत्वाचा जिल्हा असल्याने सर्व १८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.
     
या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, १८ विधानसभा निवडणूक मतदारसंघांसाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिषकुमार पांडेय, रविंदर सिंधू, सुरेंद्र पाल, श्री.जी मनीगंडासामी, जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर. बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पोलीस, एसएसटी, एफएसटी, राज्य उत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई याबाबतची माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेला अवैध मद्यसाठा, तसेच अनधिकृतपणे ने-आण करण्यात असलेल्या रोख रक्कम याबाबतचा आढावा देखील त्यांनी घेतला. तसेच आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.
     
त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून गोवा, दमण येथून अवैधरित्या येत असलेला मद्यसाठा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील हातभट्ट्यावरुन होणारी मद्याची अवैध विक्री याबाबतचा आढावा घेत असताना कारवाई दरम्यान ड्रोनचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. तसेच रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या तपासणीचा आढावा घेत असताना रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या व संशयास्पदरित्या आढळणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
     
विशेष निवडणूक निरीक्षक बी.आर बालकृष्णन यांनी एकूणच जिल्ह्यात विविध पथकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेत असतानाच सी-व्हीजीलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण याबाबतची माहिती जाणून घेतली. विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी,असेही त्यांनी सूचित केले.
     
मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असून सर्वांनी २४ तास सतर्क राहून पूर्ण क्षमतेने काम करावे व संपूर्ण मतदान प्रक्रिया उत्साही वातावरणात सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांची प्रचार रॅली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी तर्फे  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष भोईर यांच्या निवडणूक प्रचाराची रॅली १४ गावातून काढण्यात आली. त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४५ मधील प्रकाश चौधरी व प्रभाग समिती ४४ मधून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वसंत भानुशाली त्याचप्रमाणे बामर्ली गावचे परशुराम गायकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.

१४ गावातील बाळे, वडवली, नारीवली, वाकळण, बामर्ली, निघू, नागाव या गावांमध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, कॉग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विभाग प्रमुख बाळाराम पाटील, हनुमान महाराज पाटील, वडवली गावचे अरुण पाटील, राम भोईर, माजी सरपंच परेश ठक्कर, विभाग संघटिका सपना यंदारकर, बळी पाटील, उपविभाग प्रमुख अशोक जाधव यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदानादिवशी कर्मचाऱ्यांना पगारी रजा न देण्याचा नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. मुंबईत २० नोव्हेंबर रोजी कामगारांना पगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्या संस्थाविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी मुंबईत बुधवार, २० नोव्हेंबर रोजी अनिवार्य सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्रक काढून ही घोषणा केली. मतदानाच्या दिवशी सुट्टीसाठी पगार कपातीची परवानगी नसणार आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या संस्थाच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे.

'सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन्स, उपक्रम संस्था, औद्योगिक गट, व्यापारी इतर सर्व आस्थापने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा देणे बंधनकारक आहे,' असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यासोबत अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची रजा मंजूर करणे शक्य नसेल, तर कर्मचाऱ्यांना किमान चार तासांची सूट दिली जाऊ शकणार आहे. मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने मुंबईतील पात्र मतदारांना बाहेर पडण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता निवडणूक असलेल्या मतदान क्षेत्रामध्ये कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये असलेल्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. तसेच या रजेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्याची परवानगी नसणार आहे. कोणत्याही संस्थेने या नियमांचे किंवा तरतुदींचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. कलम १३५ (ब) नुसार लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ नुसार निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन न केल्यास मालकावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.

महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचाराला कल्याण ग्रामीण मतदारसंघात उस्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश मोरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीवर भर देण्यात येत असून मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारलाच पसंती देतील असा विश्वास त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना  व्यक्त केला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मतदारसंघातील रेल्वे समांतर रस्ता कचोरे गाव येथील गावदेवीचे दर्शन घेत आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. वाजत गाजत निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून या भागातील कशिष गॅलेक्सी, पारिजात, हनुमान मंदिर, श्रीकृष्ण नगर, नगरसेविका रेखा चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय, लोकग्राम, चक्कीनाका, नगरसेवक मोरेश्वर भोईर यांचे कार्यालय करून पुढे भाल गाव येथील गणेश म्हात्रे यांच्या घराजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. राज्यात असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. आमच्या सरकारने राज्यातील विद्यार्थी, महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गोरगरीब जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे जनता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला निवडून देईल असा विश्वास राजेश मोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या प्रचारावेळी महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्यासह मनोज चौधरी, कविता गावंड, प्रमिला चौधरी, किरण मोंडकर, रश्मी गव्हाणे, राजन चौधरी, राहुल म्हात्रे आणि अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील १४ मतदारसंघात होणार तिरंगी लढत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : एकीकडे ११ बंडखोर आणि त्यात ११३ अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरली असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणांगणात मनसे देखील उतरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी १४ मतदारसंघांत तिरंगी लढत होणार आहे. परिणामी प्रमुख उमेदवारांना प्रत्येक मतासाठी घाम गाळावा लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३३४ उमेदवारांचे अर्ज वैध तर ४७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. वैध ठरलेल्या ३३४ उमेदवारांपैकी अजे मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९० जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकांच्या मैदानात आता २४४ उमेदवार आहेत. यामध्ये १७ विद्यमान आमदार पुन्हा एकदा आपले नशिब आजमावणार आहेत. दुसरीकडे १८ पैकी ११ विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे. यामध्ये महायुतीत सर्वात सहा ठिकाणी तर महाविकास आघाडीत पाच ठिकाणी बंडखोरी झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट तर शिवसेना ठाकरे गटासमोर काँग्रेसमध्ये बंडाळी आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी ठाण्यात वर्चस्वाच्या लढाई तीव्र झाल्याचे दिसते. यामध्ये बंडखोर आहेतच पण अपक्षांसह वंचित बहूजन आघाडी, एमआयएम, राईट टु रीकॉल पार्टी, मराठा पार्टी अशा छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवारही सर्व मतदारसंघात उभे आहेत. मुस्लिम, बहूजन समाजाची मते हे उमेदवार आपल्याकडे काही प्रमाणात खेचू शकतात.

मतदारसंघनिहाय उमेदवार

भिवंडी ग्रामीण :
शांताराम मोरे-शिवसेना शिंदे गट, महादेव घाटाळ-शिवसेना ठाकरे गट, वनिता कथोरे- मनसे, प्रदीप हरणे-वंचित बहुजन आघाडी, विष्णू पाडवी-आरएमपीआय, अपक्ष-स्नेहा पाटील (भाजप बंडखोर), मनीषा ठाकरे

शहापूर :
दौलत दरोडा-राष्ट्रवादी काँग्रेस, पांडूरंग बरोरा-राष्ट्रवादी शरद पवार, यशवंत वाख-बसपा, हरिचंद्र खांडवी-मनसे, अपक्ष-अविनाश शिंगे (शिवसेना ठाकरे गट बंडखोर), गणेश निरगुडे, गौरव राजे, रमा शेंडे उर्फ रुपाली आरज, रंजना उघडा

भिवंडी (पश्चिम) :
महेश चौघुले-भाजप, दयानंद चोरघे-काँग्रेस, मोबीन शेख- बसपा, अमीरुल सय्यद-चीझमेकर्स पार्टी, रियाझ आझमी-एसपी, जाहिद अन्सारी-वंचित बहुजन आघाडी, वारिस पठाण-एमआयएम, अपक्ष- अस्मा चिखलीकर, आरिफ शेख, मोमिन मुशताक, मोहम्मद खान, विलास पाटील (काँग्रेस बंडखोर), शब्बीर मोमिन, शाकीर शेख

भिवंडी (पूर्व) :
परशूराम पाल-बसपा, मनोज गुळवी-मनसे, संतोष शेट्टी-शिवसेना (शिंदे गट), नारायण वंगा-राईट टू रिकॉल पार्टी, रईस शेख-सपा, अपक्ष-इस्माईल रंगरेज, तेजस आढाव, प्रकाश वड्डेपेल्ली, रफिक मुल्ला, विशाल मोरे, शंकर मुटकिरी

कल्याण पश्चिम :
विश्वनाथ भोईर (शिवसेना), सचिन बसरे (ठाकरे गट), अनिल द्विवेदी-राईट टू रिकॉल पार्टी, रजनी देवळेकर-समता पार्टी, संदिप नाईक-निर्भय महाराष्ट्र पार्टी, उल्हास भोईर-मनसे, गुरुनाथ म्हात्रे-अपक्ष, अय्याज मौलवी-वंचित बहुजन आघाडी, ममता वानखेडे-बसपा, अपक्ष- निलेश जैन, डॉ. विजय पगारे, सुनिल उतेकर, सुरेश जाधव, जयपाल कांबळे, ऐलान बरमावाला, वरुण पाटील-(भाजप बंडखोर), अनिल पाटील, कौस्तुभ बहुलेकर, कपिल सुर्यवंशी, अमित गायकवाड, राकेश मुथा, पंचशिला खडसे, सुरेश पंडागळे, निसार शेख

मुरबाड :
किसन कथोरे-भाजप, सुभाष पवार-राष्ट्रवादी शरद पवार, संगीता चेंदवणकर-मनसे, सागर अहिरे-निर्भय महाराष्ट्र पार्टी, अपक्ष-प्राजक्ता येलवे, रवींद्र सोनवणे, शरद पाटील, शैलेश वडनेरे (राष्ट्रवादी शरद पवार बंडखोर), सुभाष पवार

अंबरनाथ :
किरण भालेराव-बसपा, बालाजी किणीकर-शिवसेना, राजेश वानखेडे-ठाकरे गट, तृनेश देवळेकर- समता पार्टी, राजू डिकोंडा-अभिनव भारत जनसेवा पक्ष, रुपेश थोरात-रासप, रोहीदास कुचे-राईट टु रीकॉल पार्टी, ऍड. सतिश औसरमल-राष्ट्रीय मराठा पार्टी, सुधीर बागुल-वंचित बहुजन आघाडी, सुशिला कांबळे-बसपा (आंबेडकर), संतोष थोरात-पिपल्स पार्टी ऑफ इंडिया, अपक्ष-अपर्णा जाधव, जानु मानकर, देवीदास निकम, नारायण गायकवाड, राजेश असरोंडकर, राजेश वानखेडे, श्रीनिवास वाल्मिकी, सुजाता गायकवाड, सुनिल अहिरे, सुमेध भवार, संगिता गुप्ता

उल्हासनगर :
कुमार आयलानी-भाजप, ओमी कलानी-राष्ट्रवादी शरद पवार, भगवान भालेराव-मनसे, अमर जोशी-ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक, संजय गुप्ता-वंचित बहुजन आघाडी, अमित उपाध्याय-राइट टू रिकॉल पार्टी, पूजा वाल्मिकी-बहुजन विकास आघाडी, शाबीर खान-पीस पार्टी, सयानी दिलीप-नागरी विकास पार्टी, अपक्ष-अमित तोलानी, अनिज जैस्वाल, प्रमोद पालकर, प्रमोद पालकर , भरत राजवानी (गंगोत्री), राज चंदवानी, राजकुमार सोनी, शाह शेख, हितेश जेयसवानी, हेमंत वालेच्छा

कल्याण पूर्व:
धनंजय बोडारे-ठाकरे गट, मिलिंद ढगे-बसपा, सुलभा गायकवाड-भाजप, शैलेश तिवारी-प्रहार जनशक्ती पार्टी, विशाल पावशे-वंचित बहुजन आघाडी, प्रफुल नानोटे- राईट टू रिकॉल पार्टी, तृणेश देवळेकर-समता पार्टी, त्रिशला कांबळे-बसपा (आंबेडकर), हरिश्चंद्र पाटील-संघर्ष सेना, शालिनी वाघः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अपक्ष- विवेक पांडे, महेश गायकवाड, सिताराम गायसमुद्रे, प्रविण घोरपडे, कैलाश चैनानी, धनंजय जोगदंड, महेश गायकवाड (शिवसेना बंडखोर)

डोंबिवली :
रवींद्र चव्हाण-भाजप, दीपेश म्हात्रे- ठाकरे गट, निलेश सानप राईट टू रिकॉल पार्टी, सुरेंद्र कुमार गौतम-बसपा, सोनिया इंगोले-वंचित बहुजन आघाडी, अपक्ष-सरिता मोरे, आनंद दामोदर, रेखा रेडकर

कल्याण ग्रामीण :
दीपक खंदारे-बसपा, प्रमोद (राजू) पाटील-मनसे, राजेश मोरे-शिवसेना, सुभाष भोईर - ठाकरे गट, विकास इंगळे-वंचित बहुजन आघाडी, हबीबुर्रहमान खान- पीस पार्टी, अपक्ष-शिवा अय्यर, नरसिंग गायसमुद्रे, प्रियांका मयेकर, दिपक भालेराव, परेश बडवे, चंद्रकांत मोटे, अश्विनी गंगावणे

कोपरी पाचपाखाडी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-शिवसेना, केदार दिघे-ठाकरे गट, बाबुकुमार कांबळे-लोकराज्य पार्टी, सुशीला कांबळे-रिपब्लिकन बहुजन सेना, अपक्ष-अहमद शेख, जुम्मन पठाण, मनोज शिंदे-काँग्रेस बंडखोर, मुकेश तिवारी, सुरेश पाटिल-खेडे

ठाणे :
संजय केळकर-भाजप, राजन विचारे- ठाकरे गट, अविनाश जाधव-मनसे, हिंदुराव पाटील-राष्ट्रीय मराठा पार्टी, यक्षित पटेल- राईट टू रिकॉल पार्टी, अमर आठवले-वंचित बहुजन आघाडी, नागेश जाधव-बसपा, अपक्ष-आरती भोसले

कळवा-मुंब्रा :
जितेंद्र आव्हाड-राष्ट्रवादी शरद पवार, नजीब मुल्ला-राष्ट्रवादी काँग्रेस, सुशांत सूर्यराव-मनसे, संतोष भालेराव-बसपा, अमीर अन्सारी-राष्ट्रीय उलामा काऊन्सिल, नाज खान-बहुजन महा पार्टी, पंढरीनाथ गायकवाड-वंचित बहुजन आघाडी, मुबारक अंसारी-निर्भय महाराष्ट्र पार्टी, सरफराज खान-एआयएमआयएम, सरफराज शेख- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, ज्योत्स्ना हांडे-अपक्ष

अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प सरकार'..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
         
अमेरिका : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या ६० व्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत अमेरिकन रिपब्लिकन पार्टी चे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवला. अनेपेक्षित या अर्थाने की या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमॉक्रटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनाही विजयाचे दावेदार समजले जात होते. या निवडणुकीत दोघांच्यातही जोरदार रस्सीखेच होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात दोन्ही उमेदवारात काटे की टक्कर दाखवण्यात आली होती. दोन्ही उमेदवारांची जिंकण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्के व्यक्त करण्यात आली होती. 

जो जिंकून येईल तो अगदी काट्यावर निवडून येईल असे मानले जात होते त्यामुळेच ट्रम्प इतक्या घवघवीत मतांनी जिंकून येतील असे कोणालाही वाटले नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल २७७ इलेक्ट्रोल मत मिळवत कमला हॅरिस यांचा दारुण पराभव करत अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प सरकार' आणले. पुन्हा एकदा म्हटले  कारण २०१६ ते २०२० असे चार वर्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार अमेरिकेत होते. २०२० साली म्हणजे मागील निवडणुकीत त्यांचा ज्यो बायडेन यांनी दारुण पराभव केला होता. यावेळी मात्र त्यांनी त्या पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले आणि अमेरिकेवर पुन्हा एकदा स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले. अर्थात त्यांचा हा विजय का झाला हे देखील तपासून पहावा लागेल. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक प्रचार करताना अमेरिका फर्स्ट या धोरणाचे जोरदार समर्थन केले. डोनाल्ड ट्रम्प हे कट्टर उजव्या विचारसरणीचे आहेत त्यांनी आपल्या प्रचारात हा मुद्दा जोरदारपणे मांडला. आपल्या देशातील समस्यांना अन्य देशातून आलेले स्थलांतरित जबाबदार आहेत. ज्यो बायडेन यांच्या काळात अन्य देशातून अनेक लोक अमेरिकेत आले त्यामुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावला गेला असा जोरदार प्रचार त्यांनी केला. त्यांचा हाच प्रचार त्यांच्या पथ्यावर पडला आणि तरुणांनी त्यांना भरभरून मते दिली. त्यांनी केलेला आयातीला विरोध आणि आयात उत्पादनावर कर वाढवण्याची केलेली घोषणा ही मतदारांना पटली. अमेरिकेने अन्य देशांच्या भांडणात पडण्याची गरज नाही हे त्यांचे मतही जनतेला पटले. तसेच त्यांचा चीन आणि रशियाला असलेला विरोध जगजाहीर आहे.
 
अमेरिकेला मागे सारून चीन जागतिक महासत्ता होऊ पाहत आहे आणि त्यांना रशिया सहाय्य करत असताना ज्यो बायडेन हातावर हात ठेवून बसले आहेत असे चित्र गेली चार वर्ष दिसत होते. चीन आणि रशियाच्या वाढत्या वर्चस्वाला शह द्यायचा असेल तर डोनाल्ड ट्रम्प सारखा आक्रमक नेताच देशाचा राष्ट्राध्यक्ष हवा असे मत अमेरिकन नागरिकांचे बनले. त्यात रशिया - युक्रेन आणि इस्राईल - पॅलेस्टाईन युद्धात बायडेन यांनी स्वीकारलेले बोटचेपे धोरण मतदारांना रुचले नाही म्हणूनच अमेरिकन मतदारांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या हाती सत्ता दिली आणि कमला हॅरिस यांना नाकारले. कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ज्यो बायडेन यांनी खूप उशिरा त्यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. कमला हॅरिस यांचा पराभव हा ज्यो बायडेन यांच्यामुळेच झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण ज्यो बायडेन यांची चार वर्षाची कारकीर्द निराशाजनक अशीच होती. अमेरिकेतील सर्वात निष्क्रिय राष्ट्राध्यक्ष अशी अमेरिकेच्या इतिहासात त्यांची नोंद होईल इतकी निराशाजनक कामगिरी त्यांची होती. महागाई, बेरोजगारी, शस्त्र संस्कृती याबाबत त्यांनी दिलेले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही. बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न त्यांना व्यवस्थित हाताळता आला नाही त्यामुळे तरुणांमध्ये त्यांच्या विषयी रोष होता तो त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे २१ व्या शतकातही अमेरिकेन नागरिक एका कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाही या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सोपा झाला आणि ते पुन्हा एकदा 'ट्रम्प सरकार' म्हणत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले.