BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेतर्फे आदिवासी बंधू-भगिनींसोबत 'एक दिवाळी अशीही' असा भव्यदिव्य उपक्रम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा, देवाण घेवाणीचा. नेहमीच आपण दिवाळी सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असतो, पण सामाजिक बांधिलकी, कर्तव्य आणि भावना या गोष्टीला प्राधान्य देत संस्थेचे संस्थापक माननीय डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे, तसेच खजिनदार जाह्नवी कोल्हे यांनी, दिवाळी पूर्व शहापूर आदिवासी पाडा येथे जाऊन सर्व आदिवासी बंधू भगिनी सोबत दिवाळी साजरी केली. यामधे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) असंख्य विद्यार्थ्यांनी देखील या भव्यदिव्य उपक्रमात आपला सहभाग दर्शवला होता. 
                     
"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे".. कवी विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या पंक्ती प्रमाणे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांचे हात सतत दुसऱ्यांना काही ना काहीतरी देण्यासाठी सदैव पुढे आणि आतुरलेले असतात. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आदिवासी गरजू व्यक्तींना दिवाळीसाठी किराणा सामान, पणत्या, महिलांना साड्या, गृहापोयोगी वस्तू, चादरी, बेडशीट तर मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ, दिवाळीचा फराळ, अशा अत्यावश्यक व गरजेच्या वस्तू, भांडी देऊन त्यांना दिवाळीचा आनंद दिला.
                                              
'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा, तसेच विद्यामंदिर, पदवी महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थ्यांनी देखील घरातून जुन्या परंतु नीट नेटक्या वस्तू आणून, व तिथं पर्यंत पोहचून आपलंखारीचा वाटा दिला. 'जे एम एफ' संस्थे तर्फे सर्व आदिवासी बंधू-भगिनिंसाठी, मुलांसाठी यथेच्छ भोजनाची व्यवस्था करण्यात आली .
                                               
आज मला पराकोटीचे समाधान मिळत आहे, तो म्हणजे तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन. देणारा परमेश्वर आहे आणि माझ्या हाताने 'तो'  दान करवतो म्हणून मी मात्र एक निमित्त आहे, असे उद्गार काढून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व आदिवासी मुलांबरोबर फराळ करून व फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. 

ज्या प्रमाणे 'जे एम एफ' मधील सर्व कर्मचारी, शिक्षक हे आमच्याच कुटंबाचे सदस्य आहेत, त्याच प्रमाणे आपण देखील आमच्याच कुटुंबाचा एक भाग आहात, असे भावना पूर्ण उद्गार काढून डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी पुढच्याही वर्षीची दिवाळी आपण अशीच भव्यदिव्य करू असे आश्वासन आणि शुभेच्छा दिल्या. 
दरवर्षी प्रमाणेच वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी शिक्षक, यांनी विशेष सात दिवसांच्या शिबिराचे आयोजन ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यात दसई येथे केले. शिबिराच्या दिनचर्ये मध्ये रोज सकाळी पहाटे लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. दिवस भराच्या कार्याचे चर्चासत्र रात्री भरवणे. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. आर.एन नाडर, तसेच व्यवस्थापक श्री. विठ्ठल कोल्हे, सौ. कविता कोल्हे, घनश्याम शिरसाठ, अल्पेश खोब्रागडे, योगेश कांबळे, लक्ष्मीकांतजी पौडवाल, धनश्री वर्मा, अंजली साने, अवधूत देसाई, श्री. सुनील तांदूळकर यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले. शिबिराचे आयोजक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा यांनी देखील शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर खास एक दिवस शिबिरात घालवला.

जोगेश्वरीत पाण्याचा प्रश्न विकोपाला, नागरिक त्रस्त - अधिकारी दुर्लक्ष!

संदिप कसालकर 
जोगेश्वरी पूर्व के/पु विभागातील अनेक वसाहतींमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. न्यू शामनगर, कोकण नगर, सर्वोदय नगर, मेघवाडी, संजय नगर, गोणी नगर, पी.एम.जी.पी. वसाहत, म्हाडा कॉलनी, शिव टेकडी, आनंद नगर, अग्रवाल नगर, प्रताप नगर, स्मशान टेकडी, चाचा नगर, फ्रान्सिस वाडी, मकरानी पाडा आणि सुभाष नगर या भागांतील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले असून, संबंधित अधिकारी आणि विभागाच्या वरिष्ठांना वारंवार सांगूनही समस्येवर उपाययोजना नाही. माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी स्वतः माळवदे HE आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी रोज संपर्क साधून देखील परिस्थिती जैसे थे आहे.

“काय करावं आयुक्त साहेब, शेवटचा पर्याय म्हणून आपणांस कळवित आहे,” अशी भावना अनंत (बाळा) नर यांनी व्यक्त केली आहे.

सध्या परिस्थिती जैसे थे राहिल्यास संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का? प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली:  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत रमेश रतन पाटील, १४८- ठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव, प्रकाश भोईर, डोंबिवली मनसे शहरप्रमुख राहुल कामत, माजी शहराध्यक्ष मनोज घरत, अरुण जांभळे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरून आल्यावर सलग दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली यावर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले की आजच्याच दिवशी २०१९ ला निकाल लागला होता आणि लोकांनी मला निवडून विजयी करून दिले होते तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी पण आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सगळ्यांनी येऊन येथे फॉर्म भरला आणि दुधात साखर पडली कारण पक्षाध्यक्ष  माननीय राज साहेब पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी स्वतः इथे आले आहेत, त्यामुळे आनंदी वातावरण असून आम्ही खुशीत आहोत कारण ज्याच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असतो त्यांना आत्मविश्वास हा असतोच आणि त्या आत्मविश्वासाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 
यावेळी ठाणे लोकसभा उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः राज साहेब सोबत  आले. मागील पाच वर्ष आम्ही जे काही काम केलं असेल, कोविड च्या काळातील काम असेल, विविध विषयांची आंदोलनं असतील, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न ही जी काही मागील पाच वर्षात केलेल्या कामांच्या आधारे आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि मतं मागणार आहोत. आणि पुढील पाच वर्षे आम्हाला आमच्या शहरांसाठी उत्तम काम करायचे आहे त्याकरिता लोकांची साथ मागणार आहोत आणि लोकं आमच्या सीबत उभी राहतील अशी  आम्हाला खात्री आहे कारण  मागच्या काळात ज्या काही आघाड्या आणि युत्या घडल्या त्याबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि तिसरा पर्याय म्हणून लोकं सन्मानाने राज साहेबांकडे पाहतात म्हणून पूर्ण खात्रीने येणाऱ्या निवडणूकिला आम्ही सामोरे जाऊ आणि विजय मिळवू.
ठाण्यात महायुतीकडून संजय केळकरांना उमेदवारी दिल्याने प्रचंड नाराजी असल्याने त्याचा फायदा कसा करून घेणार ? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अविनाश जाधव म्हणाले की यंदा माझ्या विरोधात संजय केळकर (भाजप) आणि राजन विचारे (उबाठा) हे दोन उमेदवार आहेत जे मागच्या निवडणूकीला दोघेही एकत्र होते आणि एकाच गाडीवरून माझ्या विरोधात प्रचार करत होते ते आता दोघे एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पाहिलं त्या दोघांना एकमेकांच्या विरोधात निपटावं आणि मग माझ्याकडे यावं. मग मी ठरवेन कोणाविरोधात लढावं.