डोंबिवली : राज्यसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली असतानाच डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मेळावा आजोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात लोकांनी 'आमच्या हाकेला धावून येणारा रवि दादा, तुला खूप खूप शुभेच्छा.. एकविरा आई तुला काहीही कमी पडू देणार नाही' असे आशीर्वाद देऊन आगरी समाजाच्या हजारो बंधू भगिनींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना 'भारत माता की जय, जय श्रीराम' च्या घोषणा देऊन राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
त्या मेळाव्यात एका आजीने मंत्री चव्हाण यांना कमळ हातात देऊन "आणखी मोठा हो" असे सांगून भरभरून आशीर्वाद दिल्याने चव्हाण यांना भरपूर आनंद झाला. डोंबिवली पश्चिमेला ज्येष्ठ माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी चव्हाण यांच्या समर्थनार्थ रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्याला आगरी समाजाच्या बंधू भगिनींची तुडूंब गर्दी असल्याचे पहावयास मिळाले. जनार्धन म्हात्रे यांनी नवापाडा, सुभाष रोड भागात मेळावा घेतला होता.
जनार्दन म्हात्रे यांच्याकडील मेळाव्याला सभेचे स्वरूप आले होते, तर कृष्णा पाटील यांनीही जुनी डोंबिवली ग्रामस्थांच्या सहकार्याने 'वैभव हॉल' मध्ये प्रचंड गर्दी केली होती. रवींद्र चव्हाण यांचे म्हात्रे, पाटील कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असल्याने रवि दादाची निवडणूक म्हणजे आपल्या घरचा विषय असल्याचे जनार्दन म्हात्रे यांनी सगळ्या उपस्थित बांधवांना आवाहन केले. दादा कधीही काही मागत नाही, पण आता आपण देऊ या आणि दादाला मोठं व्हायला मदत करूया असे कृष्णा पाटील म्हणाले.
मेळाव्याला जमलेल्या भगिनींनी भाऊबीज म्हणून रवी दादाला मतदान करणार असल्याचे सांगताच सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि "रवि दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है" चा नारा देत सभागृह दणाणून गेले.