फलटण: २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतासाठी खूपच महत्वाचा आहे. 26 नोव्हेंबर1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. भारत सरकारने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती दिवशी हा दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. त्या मुळेच आज केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने संविधान दिनानिम्मत्त डाॅ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले,
संविधान दिनानिमित्त केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या आदेशाने आणि सातारा जिल्हा अध्यक्ष गोविंद मोरे यांच्या नियोजनानुसार फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या वेळेस उपस्थित गोविंद मोरे जिल्हाध्यक्ष सातारा, सचिन मोरे जिल्हा उपाध्यक्ष सातारा , जुनेद शेख सातारा जिल्हा मुख्य महासचिव, संदीप जाधव मंत्रालय कामकाज प्रतिनिधी, अजय अहिवळे जनसर्पंक अधिकारी सातारा, नीलकुमार गोरे फलटण सदस्य, फलटण शहर अध्यक्ष अय्याज शेख उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा