BREAKING NEWS
latest

पहिल्या खासगी रॉकेटचं प्रक्षेपण करत 'इसरो'ची ऐतिहासिक कामगिरी..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  'इसरो'च्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.  'स्कायरूट एरोस्पेस कंपनी'च्या या  रॉकेटचं नाव 'विक्रम सबऑर्बिटल' असं आहे. 'स्कायरूट एरोस्पेस' ही कंपनी स्टार्ट अप योजने अंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला 'इसरो' आणि 'इन स्पेस' या केंद्रानेही मदत केली.

  'विक्रम सबऑर्बिटल रॉकेट'ने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार, ५४५ किलो वजनाचं हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे. या रॉकेटला दिलेलं :विक्रम एस' हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिलं गेलं आहे अशी माहिती देण्यात आली.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत