BREAKING NEWS
latest

राज्यात पेट्रोल केवळ ६६ पैशांनी तर डिझेल ६४ पैशांनी झाले स्वस्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. कच्च्या तेलाचे  दर गेल्या ७ महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल ८३.६३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

  हिमाचल प्रदेशात पेट्रोल ०.६८ पैशांनी महागले असून पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९५.७४ रुपयांवर पोहचला आहे. त्याचवेळी डिझेल ०.५८ पैशांनी वाढून ८१.९९  रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झालं स्वस्त

  दुसरीकडे, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ६६ पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही ६४ पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०५.९६ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ९२.४९ रुपयांवर आले आहेत.

  महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल ०.५३ रुपयांनी तर डिझेल ०.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन्हीच्या किमती अनुक्रमे १०८.०८ रुपये प्रति लिटर आणि ९३.३५ रुपये प्रति लिटर आहेत. देशातील ४ महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३  रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल ९६.०३ रुपये. डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत