प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात गेली आहे. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवी रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली. यावेळी भाजपचे शिवाजी आव्हाड यांच्या प्रत्यक्ष भेट व मागणी नंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ फोनवरून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनते येथे प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. रेशनिंग सुविधांच्या बाबत येथील नागरिकांना डोंबिवली व मुंब्रा या शहरांवर अवलंबून राहावे लागते. दिवा शहरात रेशनिंग ऑफिस नसल्याने व रेशनिंग दुकानांचे जाळे मजबूत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी या गंभीर विषयावर मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवा शहरात रेशनिंग ऑफिस व वाढीव रेशनिंग दुकाने यांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती शिवाजी आव्हाड यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा