प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे.
युपीएससी कडून १० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्विसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर हा अंतिम निकाल जाहिर करण्यात करण्यात आला. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुलींना या संरक्षण दलाच्या या परीक्षांमध्ये समान संधी देण्यात आली होती. जून २०२२ पासून एनडीए मध्ये मुलींची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी दाखल झाली. आता अनुष्का आणि वैष्णवी यांनी मिळवलेले हे यश पाहून अनेक मुलींना या स्पर्धेचे क्षितिज खुणावू लागेल असा विश्वास वाटत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा