प्रतिनिधी: अवधुत सावंत
सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात पुणे शहरापासून करण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र समन्वयक नितीन पुंडे यांची भेट घेतली. पुणे शहरातील विधानभवान येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही महत्वाच्या पत्रकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. या वेळी 'लोकमत'चे उत्तम पाटील, 'पुण्यनगरी'चे नितीन पाटील, 'इंडिया २४ तास'चे नितीन पुंडे, 'मेकिंग महाराष्ट्र'चे चेतन शिंदे, 'बारामती टाइम्स'चे मन्सूर शेख, 'शेतकरी योद्धा'चे योगेश नालांदे, 'विशाल संविधान'चे श्रीपती खंडागळे, 'पोलीस वॉरंट'चे संतोष साळवी आणि 'खादी एक्स्प्रेस'चे अरविंद वाघमारे उपस्थित होते. सभेदरम्यान पत्रकारांना पत्रकारिता करताना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच पत्रकारांच्या आर्थिक विकास हेतू एका नवीन प्रकल्पाची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा