BREAKING NEWS
latest

सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.

  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ऍन्टिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.

  तर दुसरीकडे 'ईडी'ने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती.

  आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान 'ईडी'ला सांगितलं होतं.

  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सचिन वाझे याच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या 'ईडी प्रकरणात वाझेला अटक करण्यात आलेली नाही असं सांगत वाझे पुराव्यांशी छेडछाड किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नसल्याची हमी वकिलांनी न्यायालयाला दिली.

  सत्र न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर केला मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे असे नोंदवले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत