BREAKING NEWS
latest

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चा एकमताने महाराष्ट्र बंदचा निर्णय..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर जोरदार टीका होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

  राज्यपालांना हटवण्याची मागणीासठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता संजय राऊत यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन विचारविनिमय केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बंदमध्ये ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीची आता मदत घेतली जाणार आहे.

  काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आता पुढची रणनिती आखली गेली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार असून हे आंदोलन होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बंद होणार असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं पाणी दाखवावं असा इशाराही त्यानी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

  तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितले की, राज्यपालांकडून वारंवार सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जाते. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत