प्रतिनिधी: अवधुत सावंत
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी आपण सहमत नाही असे स्पष्ट करीत मात्र ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी याबाबत बोलू नये असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काल या सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आणि रणजित सावरकर यांनी टीका केली होती.
आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते दिवाकर रावते, संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.
आपल्याला लढता, लढता दहा वर्षे पूर्ण झाली. आज दहावा स्मृतिदिन आहे. महापौर बंगल्यात लवकरच स्मारक होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने फटकारे व्यंगचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, शिवसेना प्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्षे लागली, बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण होईल, भाजप सगळीकडचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण तो द्यायचा की नाही हा देशातील जनतेचा निर्णय आहे असे ते बोलताना म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा