BREAKING NEWS
latest

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा; डोळे उघडले असून लवकरच त्यांना पुढील ४८ तासात व्हेंटिलेटरवरुन काढण्याची शक्यता..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे.विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या 'दीनानाथ मंगेशकर' रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या १५ दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे.
  आता त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारण होत असल्याची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले असून उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढलं जाऊ शकतं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे, असं जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं.

  विक्रम गोखले यांचे जवळचे सहकारी राजेश दामले यांनीही नुकताच त्यांच्या प्रकृतीविषयी मोठा खुलासा केला. राजेश दामले यांनी माहिती दिली आहे कि, डॉक्टरांचे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कोणी ही अफवा पसरवू नका. तसेच त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत आहेत.

 दरम्यान, विक्रम गोखले यांच्या वडिलांपासून ते आजी आजोबापर्यंत संपूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीत कार्यरत होतं. विक्रम गोखले यांच्या कुटुंबाचा मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीशी देखील दीर्घकाळ संबंध आहे. विक्रम गोखले यांच्या आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या भारतीय कलाकार होत्या. इतकेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके दिग्दर्शित चित्रपटात त्यांच्या आजीने हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केल्याचेही माहिती आहे. विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचं आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत