सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. २००२ साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती.
या आधी बिल्किस बानो यांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर बिल्किस बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांची केलेल्या विनंतीनंतर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील दोषींची चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात येत असताना एक मोठा खुलासा झाला होता. तुरुंगातून सुटका झालेल्या एका दोषाीविरोधात तो पॅरोलवर असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा