BREAKING NEWS
latest

अंबरनाथ एमआयडीसी येथील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मधील कंपनीत झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


  अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीतील नेलेस (वॉलमेट) कंपनीत पाईपलाईन कंट्रोलसाठी वापरले जाणारे प्रेशर कंट्रोल वॉल तयार केले जातात. या कंपनीत २८ वर्षीय श्रीकांत सुरेश कदम हा कर्मचारी काम करत होता. आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास श्रीकांत हा कंपनीत काम करत असताना प्रेशर कंट्रोल वॉलमध्ये हवा भरून त्याची चाचणी केली जात असताना अचानक हा वॉल फुटला आणि त्याचं झाकण श्रीकांतच्या अंगावर उडालं. या दुर्घटनेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला, तर अन्य दोन कामगारही जखमी झाले. या तिघांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे श्रीकांत याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

  या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. यातील मयत श्रीकांत कदम याला कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत