प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारा, अटीतटीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपर ओवर मध्ये विजयी षटकार हा चौकार ठरल्याने, सीमेवर साई शेलार झेलबाद झाला आणि खोणीच्या श्री गणेश संघाने स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. विजेते आणि उपविजेता संघास सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गंगाराम शेलार उर्फ नाना, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, किरण ठोंबरे, महेश गायकवाड, शिल्पा शेलार, सिध्दार्थ शेलार, मनोज घरत, दिलीप भंडारी, राजू शेख, युवा आघाडीचे मितेश पेणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गेल्या २९ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या स्वर्गीय 'शिवाजी दादा शेलार स्मृती चषक २०२२' अंतर्गत डोंबिवलीतील ह.भ.प.सावळाराम महाराज क्रिडासंकुलात मर्यादित षटकांचे टेनिस क्रिकेट सामने खंबाळपाडा येथील 'एसएससीसी संघ' आणि साई शिवाजी शेलार यांनी आयोजित केले होते. ४८ संघ या सामन्यात सहभागी झाले होते. रविविरी ४ नोव्हेंबर रोजी झालेला सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा अटीतटीचा अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर मिळालेल्या 'सुपर ओवर' मध्ये फलंदाज साई शेलारचा विजयी षटकार सीमेच्या आतच पडण्यापूर्वी साई शेलार झेलबाद झाला. त्यामुळे खोणीचा श्रीगणेश संघ विजयी झाला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला दोन लाख रोख व चषक , तर उपविजेता संघास एक लाख रोख आणि चषक देण्यात आले.
सामन्याच्या पारितोषिक वितरण समयी नामदार रवींद्र चव्हाण म्हणाले की व्यसन आणि तणावपूर्ण घटनांपासून मुक्ती मिळावायची असेल तर आपण खेळांना प्राधान्य देत आपलेसे करत खिलाडूवृत्ती बाळगली पाहिजे. तर आमदार राजू पाटील यांनी खो-खो, कबड्डी आणि इतर खेळांप्रमाणे टेनिस क्रिकेट खेळाला शासनाकडून व्यावसायिक दर्जा मिळत नसून, या खेळातील तरुण नाहक वाया जात आहेत व अशा टिकेचे धनी होत असल्याची खंत व्यक्त केली.
या सामन्यांतील उत्कृष्ट खेळाडू :
अंतिम सामनावीर - किरण म्हात्रे
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - स्वयंम खाडे, दहिसर संघ
उत्कृष्ट गोलंदाज - हर्षद ठोंबरे, खोणी
उत्कृष्ट फलंदाज - साई शेलार, खंबाळपाडा.
मालिकावीर - नितेश पाटील, निळजे.
तुतीय पारितोषिक - हर्ष इलेवन संघ, दहीसर.
चतुर्थ पारितोषिक - जय हनुमान संघ, निळजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा