शिवसेना पक्षाला खिंडार पडून निर्माण झालेले ठाकरे गट आणि शिंदे गट आपसात शिवसेना कुणाची या मुद्द्यावर लढत असताना, सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालय दरबारी दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणी निकालाची वाट पाहत असताना, याबाबतीत निकालाचे घोंगडे पुढील वर्षापर्यंत भिजत पडणार आहे असे दृश्य आहे. वर्ष २०२३ मध्ये याप्रकरणी १० ते १५ जानेवारीच्या दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्याययमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्याने १६ आमदारांच्या अपात्रतेवर निकाल लांबणार आहे.
या प्रकरणी वर्ष २०२२ मध्ये निकाल येण्याची शिवसेनेच्या ठाकरे गटाला आशा लागली होती, मात्र हे वर्ष निकालाविनाच निघून जाणार असल्याची स्थिती सदृश्य आहे. ठाकरे गटाच्या सुभाष देसाई यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई व्हावी याकरिता सर्वोच्च न्यायालय दरबारी याचिका दाखल केली असून, याबतीत निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. पुढील सुनावणीची तारीख अध्याप पर्यंत स्पष्ट करण्यात आली नसल्याने, नेमक्या कुठल्या दिवशी पुढील वर्षी सुनावणी होणार हे देखील एक कोडेच ठरणार आहे.
दोन्ही गटांना लिखित बाजू मांडण्याचे आदेश दिल्यानंतर आज याप्रकरणी सुनावणी होणार होती, मात्र एकीकडे न्यायमूर्ती सुट्टीवर आहे तर दुसरीकडे नाताळाच्या निमित्ताने न्यायालयाला सुट्ट्या असल्याने सुनावणी पुढील वर्षी ढकलल्या जाणार हे आता निश्चित झाले आहे. एकंदरीतच शिवसेना कुणाची हा मुद्दा थंड बस्त्यात गुंडाळला जाणार असून, नेमक्या सुनावणीच्या दिवशी याबाबतीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा