गडचिरोली येथील सूरजागड प्रकल्पाचे काम बिलकुल थांबू दिले जाणार नाही, स्थानिकांना तिथे मोठा रोजगार दिला आहे, आता नक्षलवादी दलामध्ये स्थानिक लोक नाहीत, त्यांना अन्य राज्यातून लोक आणावे लागत आहे, स्थानिक युवकांना आता रोजगार मिळतो आहे यामुळे नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात ठामपणे सांगितले.
आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना आलेल्या धमकीची गंभीर नोंद शासनाने घेतली आहे. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सुरजागड प्रकल्प या भागातील विकासाला एक नवा आयाम देणारा प्रकल्प आहे. आणखी २०,००० कोटींची गुंतवणूक तेथे होत आहे. आता जनतेचे सुद्धा त्याला समर्थन मिळत आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
साखर कारखाने, सूत गिरण्या आणि इतर शासकीय मालमत्ता यांना शासन कर्ज हमी देते, त्या बुडीत गेल्यानंतर अशा कारखान्यांच्या मालमत्ता विकत घेताना खासगी लोकांना फायदा होतो, आता राज्य सरकारची मालमत्ता कंपनी यावर नियंत्रण ठेवेल, त्यामुळे शासनाचे होणारे नुकसान टाळता येईल, रिझर्व्ह बँकेची परवानगी या कंपनीला मिळण्यासाठी अकासमिक्ता निधी दिला आहे असा खुलासा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला, सर्व प्रकारच्या मालमत्ता धारक शासकीय संबधित कंपनी यात समाविष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा खुलासा मागितला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा