BREAKING NEWS
latest

४८ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुणे व ठाण्याची विजयी सलामी..


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार - मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेला आज सुरवात झाली. या स्पर्धेत पुणे व ठाण्याने विजयी सुरवात केली.

  साखळी सामन्याच्या कुमार गटात पुण्याने जालनाचा २२-८ असा एक डाव १४ गुणांनी पराभव केला. पुण्यातर्फे  दिनेश म्हस्कर (३.२० मि. संरक्षण, व ३ गुण ), विनायक शिंगाडे (२.३० मी. संरक्षण, व १ गुण ) यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला.

  मुली गटात ठाण्याने बीडवर १९-९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री कंक (३ मि. संरक्षण), प्रीती बालगरे (३.२० मि. संरक्षण, व १ गुण ), कल्याणी कंक (५ गुण ) असा बहारदार  खेळ केला. बीड तर्फे वैष्णवी ने (१ मि. संरक्षण ) एकतर्फी लढत दिली.
  या स्पर्धेचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. आदित्य तटकरे म्हणाले, "मैदान कौनसा भि हो हम साथ साथ रहेंगे | आता मोठ्या मैदानावर खेळायचं आहे. अनेकवेळा मातीची मैदान टर्फ ची होतं आहे. मातीत खेळण्याची मजा वेगळी असते. क्रिकेट प्रशासन गावोगावी गेलं. त्यामुळे तळातील मुलं पुढे आली. खेळ देशाला एकत्र ठेवण्याचं काम करू शकतो. राष्ट्रीय पातळीवर आपण चांगली काम करा असे आव्हान त्यांनी खेळाडूंना केले. महाराष्ट्र काय आहे, हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या. तुम्ही वर्ल्डकप मिळवण्यासाठी लागणारी ताकत ठेवून खेळा, यश तुमचेच आहे. तुमच्या सर्वांची मेहनत तुम्हाला पदक मिळवून देणार आहे".
  यावेळी उद्योजक पुनित बालन, माजी मंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड. गोविंद शर्मा, सुरेश मगर, अनिल नवघडे, रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत तटकरे, उपाध्यक्ष विजय मोरे, अलंकार कोठेकर, जिल्हा सचिव आशिष पाटील यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत