भारतीय लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत ६ ते ११ नोव्हेंबरपर्यंत खडकी (पुणे) येथील 'बीईजी अँड सेंटर' येथे महिला लष्कर भरतीची प्रकिया पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात व दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे.
सैन्य दलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लष्करात महिलांना संधी मिळावी, देश सेवेची जबाबदारी त्यांनाही पार पाडता यावी, यासाठी हा भरती मेळावा होणार आहे. खडकी येथे होणाऱ्या या भरती मेळाव्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
अशी होणार भरती
भारतीय लष्करात होत असलेली महिलांची ही भरती तीन टप्प्यात होणार आहे. त्यात शारीरिक, वैद्यकीय व लेखी परीक्षा अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिला उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे. तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर या महिला उमेदवारांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलीस विभागात ‘अग्निवीर’ म्हणून दाखल केले जाणार असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा