प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या नियोजन तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने गेली चोवीस वर्ष सातत्याने आयोजिले जात आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे त्यांच्या करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे असे हभप प्रकाश महाराज यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शुभारंभी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या शुभारंभाप्रसंगी हभप हनुमान महाराज, प्रकाश म्हात्रे, रतन म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, मुकेश पाटील, प्रेमा म्हात्रे, डॉ.सुनिता पाटील, अरुण पाटील, गजानन म्हात्रे, रघुनाथ पाटील, केशव पाटील, व्याखाते व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश म्हात्रे म्हणाले कि, हि व्याख्यानमाला यंदा 'रौप्य महोत्सवी' वर्षात पदार्पण करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली अभ्यासाबाबत भिती, दडपण या मार्गदर्शिकेमुळे कमी होईल. या व्याख्यानमालेत उपस्थित राहून, अधिक गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करा. तर हभप प्रकाश महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. प्रत्येक वर्षी हि व्याख्यानमाला वुंध्दीगत होत आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
गुरुवार २९ ते ३१ डिसेंबर पर्यंत या व्याख्यानमालेत विविध शाळेतील तज्ञ शिक्षक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. कल्याण डोंबिवलीतील तेरा शाळेतील सुमारे दिड हजार विद्यार्थी यात सहभागी झाले असून, या विद्यार्थ्यांची दुपारच्या भोजनाची सोय भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे आणि सचिव पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा