प्रतिनिधी: अवधुत सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यभर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशिवाय शिंदे गटाचे नेतेही राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज दिसत आहेत. यामुळे आता राज्यपालांना लवकरात लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वीच राज्यपालांना बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ५ डिसेंबर ते १९ डिसेंबरच्या दरम्यान राज्यपालांच्या बदलीची शक्यता आहे. पाच डिसेंबरला गुजरात विधानसभा मतदानाचा दुसरा टप्पा आहे. तर येत्या १९ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
त्यापूर्वीच त्यांची बदली होण्याची शक्यता आहे. अन्यथा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी हा मुद्दा प्रामुख्यानं उचलणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच सध्या राज्यपाल हटाव मोहिमेने वेग घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा