BREAKING NEWS
latest

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी लावण्यात आलेले ३०७ कलम काढले..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

   महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विविध संघटनांनी निषेध केला आहे. चंद्रकांत पाटलांवर पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी ११ पोलीसांवर निलंबनाची कारवाई केली होती. या निलंबित पोलीसांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात त्यांचावर लावण्यात आलेले ३०७ हे कलम काढून टाकण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

  यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, संघटनांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता या पोलिसांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे. यात तीन पोलिस अधिकारी व आठ पोलीसांचा समावेश आहे. या प्रकरणात ३०७ हे कलम काढून टाकले आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत