नागपूर येथील विधिमंडळ पक्ष कार्यालयावर आज शिंदे गटाने रीतसर ताबा घेतला असून त्यातून नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतील शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाला सिल ठोकण्यात आले होते. मात्र नागपूरच्या कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला असून ठाकरे गटाला नवीन जागी जावे लागेल.
ठाकरे गटाला बराक क्रमांक पाच मधील पाच आणि सहा अशा खोल्या कार्यालयासाठी देण्यात आल्या असून त्यावर ते काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल, सोमवार पासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा