खाद्यतेलाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. तसेच वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र अशातच सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोयाबीन तेलाचे ९०० एमएल चे पाऊच १४ रुपयांनी स्वस्त झाले. तर १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर अडीचशे रुपयांनी खाली आले.
हे दर कमी हाेण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पाम तेलाच्या दरातील घसरणीसोबत स्थानिक पातळीवर सर्वच तेलबियांची आवक वाढल्याचा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत सोयाबीन तेल प्रती पाऊचे दर १४२ रुपये होते. ते मंगळवारी १२७ रुपये झाले. संयुक्त कुटुंबाला जास्त प्रमाणावर लागणाऱ्या तेलाची गरज भागवण्यासाठी पंधरा किलोचा डबा घेतला जातो.
या डब्याचे दर गेल्या आठवड्यात घाऊक बाजारपेठेत २४०० रुपयापर्यंत गेले होते. ते मंगळवारी २५० रुपयांनी कमी होऊन २,१५० रुपयापर्यंत खाली आले. सर्वच खाद्यतेलात काही प्रमाणात पामतेल समाविष्ट केले जाते. त्याचे दर कमी अधिक झाले की सर्वच तेलांच्या दरामध्ये चढ-उतार होतात. विशेष म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच तेलाच्या दरात वाढ सुरू होती. आता ते पहिल्यांदाच घसरले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा