प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती आहे.
पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गांवदेवी पोलीसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा