'महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना' आणि 'रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना' यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र श्री २०२२' शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीतील फ्लेक्स जिम चे ४५ वर्षीय रमेश तोमर यांना तृतीय पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे पार पडली ज्याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. या स्पर्धेत १२२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
किशोर शेट्टी यांच्या 'फ्लेक्स जिम' मध्ये रमेश तोमर गेली १६ वर्ष सलग सराव करीत आहेत. 'ठाणे श्री', 'महाराष्ट्र श्री', किताबाचे ते मानकरी ठरले असून, देशपातळी वरील 'भारत श्री' या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी त्यांची जोमाने तयारी सुरु आहे. या स्पर्धेच्या तयारी करण्याकरिता त्यांना त्यांच्या नियमित आहारात दररोज सव्वा किलो चिकन,२० अंडी, प्रोटीन, मल्टी व्हिटॅमिन, मास्याचे तेल, कॅल्शियम, सफेद तांदूळ, ओट्स, मध, जाम याचा समावेश करावा लागत असून त्याकरिता त्यांना दरमहा दीड लाख रुपये खर्च असून ते या स्पर्धेची तयारी करत असून 'फ्लेक्स जिम चे किशोर शेट्टी हे त्यांचे प्रशिक्षक असून त्यांच्याकडून प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांच्या पत्नी कडून वेळोवेळी मिळणारा योग्य व पुरक आहारामुळे या स्पर्धेत मानकरी ठरलो आहे अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. मसालेदार व चमचमीत आहार न घेता ते फक्त उकडलेले अन्न प्राशन करून ते महत्वाच्या डाएट वर भर देत असल्याचे बोलले. शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत त्यांना आतापर्यंत मिळाली नसून त्याबद्दल त्यांनी प्रसिद्धी माध्यामांसमोर खेद व्यक्त करत स्वखर्चाने ते या स्पर्धेचे तयारी करत असल्याचे सांगितले. रमेश तोमर हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून ते या स्पर्धेसाठी सकाळी ४ ते ६ या वेळेत कार्डिओ व एब्स आणि ११ ते ४ वर्कआऊट असा सराव करत आहेत.
१९९८ मध्ये झालेल्या 'डोंबिवली मॅरेथॉन' स्पर्धेमध्ये रमेश तोमर यांनी १० किलोमीटर शर्यतीत भाग घेत ही शर्यत ३३ मिनिटं १२ सेकंद एवढ्या कमी वेळेत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला होता. भाजप डोंबिवली पूर्व मंडल उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी रमेश तोमर यांचे अभिनंदन करुन 'भारत श्री' स्पर्धेच्या किताबासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा