प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवलीत भाजप विरोधात राष्ट्रवादी तर्फे 'जन जागर यात्रा' रॅली काढ्यात आली होती. या रॅली दरम्यान भाजपाने विकासाचे कोणतेही काम केलेले नाही. दिशाभूल करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांनी यावेळी केली आहे.
डोंबिवली येथे बेरोजगारी आणि महागाई विरोधातल्या 'जन जागर यात्रा' रॅली निमित्त आल्या असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही खोचक टीका केली आहे. यावेळी ठाणे विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, प्रदेश संघटक सचिव व ठाणे जिल्हा निरीक्षक माया कटारिया, जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, डोंबिवली विधानसभा १४३ चे अध्यक्ष सुरेश जोशी, महिला अध्यक्ष तनुजा पाटणकर, कार्याध्यक्ष नंदू धुळे, प्रदेश पदाधिकारी रमेश हनुमंते, खजिनदार मिलिंद भालेराव, ऍडव्होकेट ब्रह्मा माळी, वार्ड अध्यक्ष भरत गायकवाड, इतर मान्यवर पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या जन जागर यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिकांच्या निवडणुका गेले वर्षभर होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. या अधिकाऱ्यांचा वाट्टेल तसा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी काम करीत नाहीत. कल्याण-डोंबिवली मध्ये भाजपाने नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवलेल्या नाहीत. भाजपने तर कामचं केलेले नाही. बेरोजगारी वाढून महागाईने जनता होरपळलेली असताना, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्वच करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. त्यामुळे मूलभूत समस्यांवरील लक्ष विचलित होत आहे. कल्याण-डोंबिवलीत काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. २७ गावातील नागरिक टॅक्स भरत असताना सुद्धा, त्यांना चालायला चांगले रस्ते व मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे निवडणुका होणे गरजेचे आहे. निवडणुका झाल्या की, नगरसेवक निवडून येतील. या नगरसेवकांना निदान नागरिक जाब तरी विचारू शकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे घाणेरडे शहर असल्याची टीका केली होती. याबद्दल विद्या चव्हाण म्हणाल्या की, गडकरी हे नेहमी खरं बोलतात. यावेळी मोदी-शहा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर देखील त्यांनी टीका केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा