BREAKING NEWS
latest

१०७ बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण-डोंबिवली शहर; वाचा सविस्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  वर्षभरात १०७ बालात्काराच्या घटनेने कल्याण-डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर कायद्यासह अनेक पथके स्थापन करण्यात आली आहे. मात्र तरीही महिलांना "पावला पावलावर असते भय, आणि सरकारनं म्हणे केली संरक्षणाची सोय' असा अनुभव कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळाला आहे. खळबळजनक बाब म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून गेल्यावर्षी १८ वर्षाखालील ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तिच यंदा ५८ झाली आहे. तर १८ वर्षावरील महिलांवर अत्याचार मध्ये गेल्यावर्षी ३६ तर यंदा ४९ गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे. 

विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ
 १०० टक्के गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी केला असला तरी महिला कल्याण-डोंबिवली शहरात सुरक्षित नसल्याचे यावरून दिसून येते. तर विनयभंगाच्या घटनेत देखील वाढ झाली असून गेल्यावर्षी १२० गुन्हे नोंद होते, त्यातील १११ गुन्ह्यांची उकल झाली होती. यंदा १८० विनयभंगाचे गुन्हे दाखल असून १७४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. यामध्ये १८ वर्षावरील गुन्हे जास्त आहेत.

अपहरणाच्या घटनां २२४ च्या घरात
  अपहरणाच्या घटनां मध्ये देखील यंदा वाढ झाली आहे. मागील वर्षी १५४ घटना अपहरणाच्या नोंद झाल्या होत्या यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा २२४ च्या घरात गेला आहे. १८ वर्षांखालील मुलींचे अपहरणमध्ये  १४५ घटना नोंद झाल्या आहेत, तर मुलांंमध्ये ७३ घटना नोंद आहेत. १८ वर्षांवरील मुली १ तर मुलांच्या ५ घटनांची नोंद आहे. या गुन्ह्यांची देखील ८० टक्के उकल पोलीसांनी केली आहे. 

संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या 100 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत
 कल्याण-डोंबिवली शहरात वाढती गुन्हेगारी पाहता, पोलीसांनी कल्याण डोंबिवलीतील १२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सराईत १०० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये खेमा गँग, कल्याण पूर्व अभिजित कुडुलकर गॅंग, डोंबिवलीतील वांग्या गॅंग व सोनसाखळी चोरी करणाऱ्या ८ इराणी गॅंगचा समावेश आहे. 

पोलीसांच्या आरोग्यावर ताण

  कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत ८ पोलीस ठाणे आहेत. परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा पोलीसांनी अहोरात्र प्रयत्न केला आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या विचारात घेता या पोलीस ठाण्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.परिणामी गुन्ह्यांचा तपास, नाकाबंदी, व्हीआयपी, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे प्रयत्न, १२ ते १४ तासांची ड्यूटी, रजा तर सोडाच हक्काची सुटीही अनेकदा घेता येत नाही. कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. इच्छा असूनही नातेवाईक, मित्रांच्या समारंभांना जाता येत नाही. अशा ताण-तणावाने पोलीसांचे रोजचं जगणंच व्यापलेलं आहे. ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे पोलीसांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. 

३ हजारच्या आसपास गुन्हे दाखल

   कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत २०२२ मध्ये अखेरपर्यंत जवळपास ३ हजारच्या आसपास गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. पोलीसांची उल्लेनीय कामगिरी आणि सीसीटिव्हीच्या स्मार्टनेसपणामुळे शहरातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ८० टक्के आहे. खून,/खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे १०० टक्के उघडकीस आले आहेत. कल्याण-डोंबिवलीत यंदाच्या वर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८० टक्के महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण पाहता बलात्कार, विनयभंग यांसारखे गुन्हे देखील १०० टक्के उघडकीस आले आहेत.१२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली गेली आहे, तर एमपीडीए  अंतर्गत नऊ जणांवर कारवाई केली आहे. तर १०० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे, अशी माहिती झोन-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. 

सीसीटीव्हीचा स्मार्टनेस आला उपयोगी
  
  कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच अनेक दुकाने आणि सोसायटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. शहरात सुमारे १ हजारांच्या वर सीसीटिव्ही कॅमेरे लावल्यामुळे एखादा गुन्हा घडला, तर त्या आरोपीला पकडण्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज हा मोठा दुवा ठरत असल्याने पोलीसांनी सांगितले.


दाखल तसेच उघड झालेले गुन्हे २०२२ - २०२१ 
गुन्हे दाखल/उघड  -  दाखल/उघड

खून                       18/18  -  19/18

खूनाचा प्रयत्न        22/22  -    17/17

दरोडा                       1/1    -     0/0 

जबरी चोरी            140/117 - 101/66

घरफोडी                154/93   - 170/67

चोरी                      616/311 - 611/242

वाहन चोरी             381/176 - 390/147

दुखापत                 399/383 - 366/359

बलात्कार               107/107 -  84/83

विनयभंग               180/174 - 120/111
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत