दिनांक १४/०१/२०२३ रोजी १०.३० वाजता घरडा सर्कल ते बंदिश पॅलेस चौक दरम्यान पोहवा. विकास माळी नेमणूक मानपाडा पोलीस स्टेशन हे पॅट्रोलिंग करीत असताना सार्वजनिक रोडवर त्यांना एक पाकीट (वॉलेट) मिळून आले त्यात पाचशे पाचशेच्या नोटा आणि २००० च्या नोटा व ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असे मिळून आले.
सदर पाकीट (वॉलेट) हे श्रीरंग श्रीपाद पडळकर रा. डोंबिवली पूर्व यांचे असून तशी खात्री केली असता त्या पाकीट (वॉलेट) मध्ये एकूण ४०,००० रुपये अशी रोख रक्कम असून दि. १४/०१/२०२३ रोजी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमाडे आणि पोलीस हवालदार विकास माळी यांनी त्याचे पाकीट (वॉलेट) मधील पैसे व इतर सामान त्यांना परत देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा