सोशल मिडियावर कर्नाटकातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मंदिराचा पुजारी एका महिलेला केस ओढत मंदिरातून बाहेर काढताना दिसत आहे. ही घटना २१ डिसेंबरची आहे. मात्र, ही घटना आता समोर आली आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरुमधील अमृता हल्ली परिसरात वेंकटेशा देवाचे मंदिर आहे. घटनेच्या दिवशी एक महिला स्वतः भगवान व्यंकटेश्वराची पत्नी असल्याचा दावा करत पुजाऱ्यासोबत वाद घालू लागली, आणि तिला त्यांच्या मूर्तीजवळ बसायचं होते असा दावा पुजाऱ्याने केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार ही संपूर्ण घटना 'लक्ष्मी नरसिंह स्वामी' मंदिरातील आहे. हा व्हिडिओ दीड मिनिटाचा आहे. ज्यामध्ये ती महिला मूर्तीजवळ बसण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे मंदिराचा पुजारी तिचे केस पकडून, धक्काबुक्की करत तिला मंदिराबाहेर ओढत असतानाचे व्हिडिओत दिसत आहे. पण पुजारी असूनही महिलेला अशी वागणूक देण्यात आल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिला बाहेर जात नसल्यामुळे पुजाऱ्याने तिला चापट मारून खाली पाडलं, त्यानंतर एक व्यक्ती काठी घेऊन आला, त्यानंतर ही महिला पळून गेली. सध्या या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
ही घटना घडली त्यावेळी पुजाऱ्यासोबतच आणखी तीन लोक, ज्यापैकी दोन जण पुजाऱ्यासारखे कपडे घाललेले होते. पण त्यापैकी कोणीही पुजाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पोलीसांनीही त्या पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पुजारी ज्या पद्धतीने तिला बाहेर ओढत आहेत, त्यावरुन सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा