मुंबई: अपहार केलेली होन्डा सिटी मोटर कार अवघ्या ४ दिवसांत हस्तगत करण्यात अंबोली पोलिसांना यश आले आहे.
मोटार वाहन अपहार केल्याचा गुन्हा ४ दिवसांत उघडकीस आणुन आरोपीतासह मालमत्ता हस्तगत केल्याबाबत
अनुस्तिती अनिमिष सरकार यांनी त्यांची होन्डा सिटी कार आसाम राज्यात पाठविण्यासाठी वीआरएल लॉजिस्टीकला ऑनलाईन संपर्क केला आणि त्यासाठी लागणारे शुल्क हि पाठवले. वीआरएल लॉजिस्टीकचा कार चालक अविलाश शर्मा याने खोटी कारणे सांगत अनुस्तिति यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले आणि आसाम राज्यात न जाता कारचे अपहरण केले. अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच अवघ्या ४ दिवसांत गाडी हस्तगत करत आरोपी अविलाश ला कलम ४२०, ४०६ भादवि अंतर्गत ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान अविलाश कडून फिगो फोर्ड कार व हुंदाई एसेंट अशा इतर दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
हि संपूर्ण यशस्वी कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, परमजितसिंह दहिया, परिमंडळ - ९ चे पोलीस उप-आयुक्त अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओशिवरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुर्यकांत बांगर, अंबोली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे, गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक अब्दुल रउफ शेख यांच्या नियोजनबध्द देखरेखीखाली पोलीस उप निरीक्षक रामेश्वर ठाणगे, पोह. विलास दुलम, प्रकाश नागे, संदीप सावंत, पोशि शिवाजी कासार, सुनिल घुगे, निखिल बाबर, संदीप सांगळे यांनी केलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा