BREAKING NEWS
latest

हॉटेलमध्ये आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  यवतमाळ येथे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला. ही घटना सोमवारी सकाळी स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये उघडकीस आली. पोलीस शिपायाचा नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झाले नसून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मागीलाल चव्हाण (वय: ३१ वर्षे) राहणार. पुसद असे मृतक पोलीस शिपायाचे नाव असून ती वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. गेल्या एक महिन्यापूर्वी त्याची शहर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात रुजु झाल्यानंतर दोन दिवसापासून तो स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये राहत होता. 

  १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सदर पोलीस शिपाई हॉटेलमध्ये गेला होता. दरम्यान १३ फेब्रुवारी रोजी सकाळी हॉटेलच्या रुममधून बाहेर न आल्याने आतमध्ये पाहिले असता मागीलाल चव्हाण हा पोलीस शिपाई मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलीसांना अजून मृत्यूचं नेमकं कारण कळु शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. गेल्या काही दिवसापूर्वीच त्याचा साखर पुडा झाला होता. त्याच्या मागे त्याचे आई-वडील, बहिण, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत