छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त 'भारत जोडो यात्रे' संदर्भातच होते, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सबोधित करताना “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे.” या सुचक भाषणातून सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा