प्रतिनिधी: अवधुत सावंत
येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील ३० टक्के फिडर हे आमचं सरकार सौरऊर्जेवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'कन्हैया ऍग्रो कंपनी'च्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा