प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव कोरोना काळात म्हणजेच २०२० पासून गेले ३ वर्ष बंद होता. आंतरराष्ट्रीय अश्या भव्य ह्या तरण तलावात एकूण ३ तलाव आहेत एक मुख्य तलाव, एक डायविंग साठी आणि तिसरा लहान मुलांसाठी असे तीन तरण तलाव आहेत. कोरोना काळात शेजारील बंधिस्त सभागॄह, व्यायाम शाळा व स्कॉश मैदानात महापालिकेचे कोरोना रुग्णालय उभारल्यामुळे व तरण तलावाच्या कार्यालयात डॉक्टरांच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. ह्याच कारणांमुळे तरणतलावाचा व महत्त्वाचा फिल्टरेशन प्लांट चे मेंटनन्स करणे शक्य झाले नाही. नंतरच्या काळात फिल्ट्रेशन प्लांट मेंटेनन्स करिता ठेकेदार मिळत नव्हता त्या कारणाने तरण तलाव दुरुस्ती रेंगाळली होती. गेले वर्षभर तरण तलाव दुरुस्त व्हावा म्हणून महापालिका स्तरावर राजेश कदम, सागर जेधे ह्यांचा पाठपुरावा सुरु होता त्याचा अखेर काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यानी त्वरीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांना भेटण्यास सांगितले.
त्यानुसार काल राजेश कदम, माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील, शहर समन्वयक जितेन पाटील, शिवसेना युवासेना शहर अधिकारी सागर जेधे ह्यांनी काल कल्याण येथे महापालिकेत जाऊन आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांची भेट घेतली असता त्यानी तरण तलाव त्वरित उद्याच्या उद्या म्हणजेच गुरुवार दि. २ मार्च पासून सुरु करावा असे आदेश दिले, ह्या वेळी शिवसेना शिष्ठमंडळांने आयुक्त महोदय यांनी आयुक्त श्री.दांगडे साहेबांचे आभार मानले व तेथून थेट डोंबिवलीच्या क्रीडासंकुल तरण तलाव येथे जाऊन वरिष्ठ अभियंता श्री. सांगळे ह्यांची भेट घेतली. श्री. सांगळे ह्यांनी डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलाव आज २ मार्च रोजी किरकोळ डागडुजी करुन क्रीडा प्रेमींच्या वापरासाठी सायंकाळच्या सत्रा पासून सुरु करण्यात येईल परंतु नेहमीप्रमाणे शुक्रवारी बंद असल्यमुळे तो शनिवार ४ मार्च पासून पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे असे प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे.
तरण तलाव लवकरात लवकर सुरु व्हावा ह्यासाठी पाठपुरावा करत असलेले डोंबिवलीतील तमाम क्रिडा प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून महापालिकेचा तरण तलाव ऐन सुट्टीच्या हंगामात सुरु होणार आहे त्यामुळे त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेने तर्फे करण्यात आले असून क्रीडा प्रेमी नागरिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्यांचे व महापालिका आयुक्तांचे आभार मानत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा