BREAKING NEWS
latest

औद्योगिक सुरक्षेच्या जागृतीसाठी डोंबिवलीत आयोजलेल्या भव्य रॅलीत कंपनी मालकांसह ३०० कामगारांचा सहभाग..

 


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात औद्योगिक सुरक्षा सप्ताह दि.४ ते १० मार्च पर्यंत सुरू असून ५२ व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहनिमित्त कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (कामा) आणि औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचनालाय यांच्या संयुक्त माध्यमातून डोंबिवलीत गुरुवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कामा अर्थात 'कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन' आणि 'औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचलनालय' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत गुरुवारी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत कामा संघटनेचे सदस्य तथा कंपनी मालकांसह जवळपास ३०० कामगार सहभागी झाले होते. ४ ते १० मार्चपर्यंत औद्योगिक सुरक्षा सप्ताह चालू आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यात काम करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर कारखान्यातील यंत्रसामुग्री व महागड्या मशिनचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-१ व फेज-२ मधील अनेक कारखान्यांत सुरक्षितता कशी करावी, आग लागल्याच्या घटना घडल्यास कश्याप्रकारे उपाययोजना करून स्वतःचा जीव वाचवता येईल, या संदर्भात कारखान्यांमध्ये पोस्टर व स्लोगन सारखे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे 'कामा' संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.



 'कामा' च्या कार्यालयापासून काढलेली ही रॅली औद्योगिक विभागांतील सर्व रस्त्यांवर फिरून पुन्हा तिचे 'कामा' च्या कार्यालयात विसर्जन करण्यात आले. 'इवोनिक कॅटलिस्ट' आणि 'घरडा केमिकल्स' या दोन कंपन्यांच्या गेटवर सभा घेण्यात आल्या व चहापाण्याची सोय करण्यात आली होती.


तत्पूर्वी कामाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सभेत औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचनालयाचे सहाय्यक संचालक विनायक लढि यांच्यासह कामाचे पदाधिकारी संजीव काटेकर, उदय वालावलकर, विकास पाटील, मनोज जालन, मुरली अय्यर, आदींनी उपस्थित कामगारांना सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले. औद्योगिक कारखान्यांमधील विविध यंत्रे आणि त्यांचे क्लिष्ट प्रक्रियांशी संबंधित तेथील कामगारांच्या सुरक्षिततेची व जीविताची सुरक्षा आपण समजून घेणे आवश्यक आहे. कामगार ज्या कंपनीमध्ये, ज्या यंत्रावर, ज्या परिस्थितीमध्ये, जे काम करत असतो, ते आपले काम, यंत्र व त्याचे तंत्र व्यवस्थित शास्त्रीयदृष्ट्‌या बारकाव्यानिशी समजून घेणे हेच औद्योगिक सुरक्षेचे समीकरण असल्याचे 'कामा' संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत